आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅच पाहण्‍यासाठी आलेल्‍या फॅनचे नशीब फळफळले, आठवडाभरातच बनला क्रिकेटर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्‍ट्रलिया आणि पाकिस्‍तानच्‍या मॅचमध्‍ये एक लोकल बॉय स्‍टार बनला. - Divya Marathi
ऑस्‍ट्रलिया आणि पाकिस्‍तानच्‍या मॅचमध्‍ये एक लोकल बॉय स्‍टार बनला.
8स्‍पोर्ट डेस्‍क- सिडनी येथे ऑस्‍ट्रलिया आणि पाकिस्‍तान दरम्‍यान कसोटी सुरू असताना एका फॅनचे नशीब फळफळले आहे. या फॅनला थेट मॅच खेळण्‍याची संधी मिळाली. गेल्या आठवड्यात मेलबर्न येथे टेस्‍ट पाहण्‍यासाठी हा तरुण आला होता. त्यायानंतर सात दिवसांत सिडनी येथे ऑस्‍ट्रलियाच्‍या खेळांडूसोबत खेळण्‍याची संधी त्‍याला मिळाली.  
 
कशी मिळाली संधी?  
- सिडनी येथे ऑस्‍ट्रेलिया आणि पाकिस्‍तानदरम्यान टेस्‍ट सुरू असताना ही घटना घडली. 
- युवकाचे नाव मिकी अॅडवडर्स आहे. त्‍याला ऑस्‍ट्रेलियाने फिल्डींगसाठी बोलावले होते. 
- मिकी स्‍थानिक क्रिकेट क्‍लबमध्‍ये वारिंगाह टीमचा वेगवान गोलंदाज आहे. यासोबतच 'सिडनी सिक्‍सर्स' आणि 'न्‍यू साऊथ वेल्‍स अंडर 23' टीममध्‍येही मिकीचा समावेश आहे. 
- ऑस्‍ट्रेलिया क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार आंतरराष्‍ट्रीय टेस्‍टदरम्‍यान स्‍थानिक खेळाडूूला खेळामध्‍ये सहभागी करता येऊ शकते.
- याच नियमांतर्गत डेविड वॉर्नरच्‍या जागी मिकी एडवडर्सला क्षेत्ररक्षणासाठी बोलावण्‍यात आले. 

फिल्‍डींग केल्‍यानंतर बनला सेलिब्रिटी 
- या घटनेनंतर मिकी अॅडवडर्स ऑस्‍ट्रेलियात सेलिब्रिटी बनला आहे. 
- मिकी मैदानात उतरताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्‍या कडकडाटात त्‍याचे स्‍वागत केले. 
- यानंतर टीव्‍ही कॅमेऱ्याचेही त्‍याचेकडे लक्ष गेले आणि काही वेळातच ट्विटरवरही मिकी छायाचित्रासह टॉप ट्रेंडवर होता.  
- मिकी मैदानात होता तोपर्यंत प्रेक्षक त्‍याचा नावाचा जयघोष करीत होती. परत आल्‍यावर प्रेक्षकांनी त्‍याला स्‍टॅडिंग ओवेशन दिले. 
- सामन्‍याची कॉमेन्‍ट्री करताना शेन वॉर्ननेही मिकीची स्‍तूती केली. 
- शेन वॉर्न म्‍हणाला, 'नव्‍या खेळाडूने शानदार क्षेत्ररक्षण केले आहे. त्‍याला थोडेच चेंडू अडवण्‍याची संधी मिळाली. मात्र त्‍यातच त्‍याने सिध्‍द केले आहे की, तो एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. सोनेरी केसांच्‍या या खेळाडूला प्रेक्षकही पसंत करीत आहे.' 
 
काही दिवसांपूर्वीच मॅच बघण्‍यासाठी गेला होता
- मिकी एडवडर्स एका हफ्त्‍यापूर्वी मेलबॉर्न येथे दुसरी टेस्‍ट मॅच पाहण्‍यासाठी गेला होता. 
- त्‍यावेळी एडवडर्सने मित्रांसोबत बियर पित मॅच बघितली होती.
  
पुढील स्‍लाइडवर पहा, अचानक स्‍टार बनलेल्‍या या खेळाडूची कशी आहे लाईफ
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)