आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : क्षमतेवरील प्रश्नचिन्ह योग्य क्षणी मिटवल्याचा आनंद : मुरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अनेक वेळा माझ्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. मात्र, योग्य क्षणी आणि महत्त्वाच्या मोक्यावर मी क्षमता सिद्ध कररून देशाला पदक मिळवून दिल्याचा मला आनंद असल्याचे टेनिसपटू आणि तब्बल एका शतकानंतर इंग्लंडला सुवर्णपदक मिळवून देणा-या अँडी मुरे याने सांगितले.
ऑलिम्पिक सिंगल्समधील 1908 मध्ये जोसिह रिची यांच्यानंतर पदक मिळविणारा मचरे हा पहिला टेनिसपटू ठरला आहे. विशेष म्हणजे हा योग लंडन ऑलिम्पिकमध्ये जुळून आल्याने त्याच्यासह संपूर्ण ब्रिटनवासीयांना हा विजय अत्यंत मोलाचा आहे. याबाबत बोलताना मुरे म्हणतो की रॉजरविरुद्ध तीन सरळ सेटमध्ये जिंकणे, तेदेखील सेंटरकोर्टवर म्हणजे मी नक्कीच चांगला खेळ केला असणार. हा सामना आमच्या दोघांच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा होता. मी विम्बल्डनमध्ये रॉजरविरुद्ध हारल्यानंतर माझ्या खेळात जर काही परिपक्वता दिसली असेल तर तो नक्कीच माझ्या मेहनतीचा भाग असल्याचेही त्याने नमूद केले. पराभवातून काहीतरी शिकायला मिळते, हे तत्व लक्षात ठेवूनच मी पराभवानंतर विचार करतो. रविवारच्या विजयामुळे माझ्या विम्बल्डन पराभवाची बोच काहीशी कमी झाल्यासारखे मला वाटत असल्याचे त्याने नमूद केले.
जर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमची ,काग्रता कायम ठेवण्यात यश मिळवले तर तुम्ही कोणताही सामना जिंकू शकता. हे या विजयातून मी शिकलो. त्यामुळे हा अनुभव मला अधिक चांगला टेनीसपटू म्हणून घडविण्यासाठी उपयुक्त ठरणारा असल्याचे त्याने नमूद केले. विम्बल्डनमधील फायनलच्या पराभवानंतर मी तब्बल दोन दिवस अस्वस्थ आणि भावुक झालो होतो . तर या विजयानंतर मला अचानकपणे खूप मनशांती लाभल्यासारखे वाटत असल्याचेही मुरे याने नमूद केले. अर्थात मी जेव्हा माझ्या कुटुंबिय आरि मित्रपरिवारासह हा विजय साजरा करेन तेव्हा मी पुन्हा भावनाविवश होईन, असे वाटत असल्याचेहरी मुरे याने कबूल केले.