आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- ५० मीटर रायफल प्रोन प्रकाराच्या अंतिम फेरीत पोहचण्यास गगन नारंगला अपयश आले. मात्र, भारताचा दुसरा नेमबाज जयदीप कर्माकर याने अंतिम फेरीत स्थान मिळवित भारताच्या आशा कायम ठेवल्या.
चारच दिवसापूर्वी १० मीटर एयर रायफल प्रकारात कांस्यपदक जिंकलेल्या गगनकडून आज पुन्हा अपेक्षा व्यक्त होत होत्या. मात्र त्याला ६०० पैकी केवळ ५९३ गुण मिळाल्याने तो ५० स्पर्धकात १८ व्या स्थानावर गेला. नारंगने ९८, १००, १००, ९७, ९८, १०० असे गुण घेतले. मात्र, तिस-या आणि चौथ्या राऊंडने चांगली कामगिरी करता न आल्याने गगनला बाहेर पडावे लागले.
जयदीप कर्माकरने ६०० पैकी ५९५ गुण मिळवत सातव्या स्थानी झेप घेतली. याचबरोबर आठ जणात होणा-या अंतिम फेरीत त्याने धडक मारली. बेलारुसच्या सर्गेयी मार्टिनोने ६०० पैकी ६०० गुण प्रथम क्रमांक मिळवित ऑलिंपिकमध्ये विक्रम नोंदविला.
PHOTOS: ऑलिम्पिक 2012 मधील आतापर्यंतचे गोल्ड मेडलिस्ट
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.