आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narang Crashes Out, Karmakar Keeps India's Hopes Alive

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC: जॉयदीप करमाकर अंतिमफेरीत तर गगन नारंग बाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- 25 मीटर रॅपिड फायर पिस्‍तुल स्‍पर्धेत विजयकुमारने शानदार प्रदर्शन करत भारताला पहिले रौप्‍य पदक मिळवून दिले आहे. अत्‍यंत चुरशीने झालेल्‍या या सामन्‍यात फक्‍त चार गुणांनी त्‍याचे सुवर्ण पदक हुकले. जागतिक विक्रमाची बरोबरी करीत क्‍युबाच्‍या लॉरिस पूपोने सुवर्ण पदक मिळवले. पूपोने 34 आणि विजयकुमारने 30 अंक मिळवले. चीनचा डिंग फेंगने 27 गुण मिळवून कांस्‍य पदक प्राप्‍त केले.
लंडन ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिलेच रौप्‍य पदक आहे. आता भारताकडे एक रौप्‍य आणि कांस्‍य पदक आहे.
जॉयदीप कर्माकर अंतिमफेरीत तर गगन नारंग बाद
ऑलिम्पिकचा आठवा दिवस भारतासाठी संमिश्र ठरला. भारताची स्‍टार बॅडमिंटनपटू साईना नेहवाल एकेरीच्‍या सेमीफायनलमध्‍ये पराभूत झाली. तर दुसरीकडे पुरूषांच्‍या 50 मीटर प्रोन रायफल स्‍पर्धेत जॉयदीप कर्माकरने अंतिम फेरीत स्‍थान मिळवले. 10 मीटर नेमबाजीतील कास्‍य पदक विजेता गगन नारंगने मात्र निराशा केली. जॉयदीपच्‍या रूपाने भारताला पदक मिळण्‍याच्‍या थोडयाफार अपेक्षा आहेत.
जॉयदीप पात्रता फेरीत 595 गुण मिळवून संयुक्‍त चौथ्‍या स्‍थानी राहिला. दुसरीकडे गगनला फक्‍त 593 गुण मिळवता आले. तो 50 स्‍पर्धकात 18 व्‍या स्‍थानी राहिला. जॉयदीपने शूटऑफमध्‍ये चांगले प्रदर्शन केले.
गोळाफेकीतही भारताच्‍या पदरी निराशा आली. ओमप्रकाश सिंगला ऑलिम्पिकमधून बाहेर पडावे लागले. शुक्रवारी झालेल्‍या पात्रता फेरीत त्‍याने 19.86 मीटर गोळा फेकला आणि ग्रुप बीमध्‍ये 18 खेळाडूंमध्‍ये 10 व्‍या स्‍थानी तो राहिला. अमेरिकेच्‍या ही रेजी होफाने सर्वात अधिक 21.36 मीटर अंतर इतका लांब गोळा फेकला.
जाणून घ्‍या रौप्‍य पदक विजेत्या विजयकुमार विषयी
OLYMPIC: भारतीय हॉकी संघाचा सलग तिसरा पराभव
OLYMPIC : सायना नेहवालचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले
OLYMPIC मसाला: लंडनमध्‍येही पसरलाय अंधश्रद्धेचा वास
OLYMPIC : गगन नारंग पात्रता फेरीत बाद, जयदीप कर्माकर अंतिम फेरीत
OLYMPIC : 'चीनी भिंत' अभेद्यच, सायना नेहवालचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले
OLYMPIC सातवा दिवस: साईना 'शायनिंग' तर जयवर 'भगवान' नाराज !
OLYMPIC: अद्भुत वेगामुळे शिवेन ठरतेय एक जिवंत दंतकथा