आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय संघ वेस्ट इंडीजला रवाना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदानंतर भारतीय क्रिकेट संघ बुधवारी जमैकाला रवाना झाला. टीम इंडिया आता वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांचा समावेश असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत सहभागी होत आहे. पहिली लढत 28 जून रोजी श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात होईल. भारत 30 जून रोजी यजमान विंडीज विरुद्ध आपली मोहीम सुरू करणार आहे. ‘आता जमैकाकडे रवाना होत आहे. ते आमचे पुढील लक्ष्य आहे. इंग्लंडमधील कामगिरीने उत्साहित झालो आहोत,’ असे ट्विट अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने बुधवारी केले.