आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : ‘डोपिंगचा डाग पुसला गेला’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - दोघेही सध्याच्या सर्वश्रेष्ठ धावपटूंपैकी एक. दोघेही अमेरिकन, दोघेही 100 मीटरच्या स्पर्धेत सहभागी झाले. मात्र स्पर्धा संपल्यानंतर दोघेही झाले भावविभोर. कारण एकाला चौथ्या क्रमांकावर राहिल्याने पदक न मिळाल्याने त्याच्या तोंडून शब्द फुटेनात, तर दुस-याला या अखेरच्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळाल्याने अत्यानंदात त्याच्या भावना व्यक्त करायला शब्दच सापडेना.
दोघांच्याही भावना पूर्ण भिन्न मात्र अवस्था जवळपास सारखीच. टायसन गे याला पुन्हा एकदा ऑलिम्पिकमधून रिकाम्या हाताने परतावे लागले. तर जस्टीन गॅटलीनला अगदी एक शतांश सेकंदाच्या फरकाने कांस्य मिळाले. या धक्क्यातून गे बराच काळ सावरलाच नाही. डोळ्यातून अश्रू ओघळत असताना तो कसाबसा इतकेच म्हणू शकला, ‘आय ट्राइड मॅन, आय ट्राईड माय बेस्ट’. ब्रांझ पदक प्राप्त केलेल्या गॅटलीनसाठीदेखील हा एक प्रचंड भावनात्मक क्षण होता. आठ वर्षांपूर्वीच्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर गॅटलीन हा सर्वाधिक वेगवान धावपटू ठरला होता. मात्र 2006 साली अतिरिक्त टेस्टेस्टेरॉन घेतल्याच्या प्रकरणात दोषी आढळल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ती बंदी नुकतीच उठल्यापासून त्याने ऑलिम्पिक हेच ध्येय नजरेसमोर ठेवून तयारी केली होती. या पदकामुळे माझ्यावरील डोपिंगचा डाग पुसला गेल्याने मला अत्यानंद झाला आहे.
आता नाही तर केव्हाच नाही - आता मी तिशीत पोहोचल्याने त्याला पुढचे ऑलिम्पिक खेळता येणार नाही, हे निश्चित होते. त्यामुळे या वेळी शक्य झाले नाही, तर कधीच नाही हे लक्षात असल्याने मी अगदी जीवतोड मेहनत या पदकासाठी केली होती. तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा मला ऑलिम्पिकमध्ये सहभागाची संधी मिळाली होती. अनेकांनी मला फेसबुक, ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या होत्या. त्या सर्वांच्या विश्वासाला मी पात्र ठरल्याचा आनंद आहे. त्यात सुवर्ण हे सुवर्णच असते; मात्र कांस्यदेखील कांस्यच असते. - जस्टीन गॅटलीन , कांस्यपदकविजेता.