आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC 11 वा दिवस: ब्राझीलचा चीनला 'दे धक्‍का' आणि भारताचा 'एम' फॅक्‍टर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- हिट
मेरी कोमचा जयजयकार
मेरी कोम...मेरी कोम या नावाने लंडनचा एक्‍सेल एरीना परिसर दुमदुमत होता. निमित्त होते मेरी कोमचा बॉक्सिंगमधील आणखी एक विजय. या विजयाबरोबरच तिने सेमीफाईनलमध्‍ये जागा मिळवली असून एक पदक देखील नक्‍की केले आहे. मात्र मेरी कोमचे लक्ष्‍य सुवर्ण पदक पटकावणे आहे. क्‍वार्टर फायनलमध्‍ये तिने सहज विजय मिळवला.
विकासकडून अपेक्षा
विकास गौडाने 2010 साली राष्‍ट्रकुल क्रीडा स्‍पर्धेत रौप्‍य तर त्‍याचवर्षी झालेल्‍या आशियाई खेळात कांस्‍य पदक पटकाविले. ऑलिम्पिक खेळांमध्‍ये अ‍ॅथलीट विकास गौडाकडून कमीच अपेक्षा होत्‍या. मात्र त्‍याने थाळीफेक स्‍पर्धेच्‍या फायनलमध्‍ये जागा मिळवून अपेक्षा वाढवल्‍या आहेत.
परंतु, त्‍याचा पुढील प्रवास सोपा असणार नाही. जगभरातील अव्‍वल अ‍ॅथलीटशी त्‍याला सामना करावा लागणार आहे.
जिम्‍नॅस्टिक
जिम्‍नॅस्टिकमध्‍ये ब्राझीलच्‍या आर्थर जनेटीने चीनच्‍या चेन यिबिंगला धक्‍का देत रिंग स्‍पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. बीजिंग ऑलिम्पिकचा सुवर्ण पदक विजेता येनला आर्थर अशी कामगिरी करेन यावर विश्‍वासच बसला नव्‍हता. जिमनॅस्टिकचा महान खेळाडू असलेला चीनचा येन आपल्‍या विजयाबद्दल आश्‍वस्‍त होता. मात्र आर्थरने त्‍याला धक्‍का देत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
दक्षिण कोरियाचे तिरंदाज
तिरंदाजीमध्‍ये आपले वर्चस्‍व सिद्ध करताना दक्षिण कोरियाने आणखी एक पदक आपल्‍या नावे केले आहे. दक्षिण कोरियाचा ओह जिन हायेकने जपानच्‍या ताकाहारू फुरूकावाला 7-1 ने पराभूत केले. या शानदार विजयाबरोबर त्‍याने सुवर्ण पदक पटकावले. तिरंदाजीमध्‍ये दक्षिण कोरियाचे हे तिसरे सुवर्ण पदक आहे.
मिस
विजेंद्रचा पराभव
लंडन ऑलिम्पिकमध्‍ये ज्‍या बॉक्‍सरकडून पदकाच्‍या मोठया अपेक्षा होत्‍या. तो आता स्‍पर्धेबाहेर पडला आहे. क्‍वार्टर फायनल सामन्‍यात चांगली सुरूवात करूनही विजेंद्रला उजबेकिस्‍तानच्‍या बॉक्‍सरकडून पराभव स्‍वीकारावा लागला. दुस-या आणि तिस-या फेरीत विजेंद्र बॅकफूटवर गेला. त्‍याचा फायदा प्रतिस्‍पर्धी बॉक्‍सरला झाला. त्‍याच्‍या पराभवामुळे भारतीय कॅंपमध्‍ये निराशा पसरली होती.
गगन नारंगकडून निराशा
10 मीटर एअर रायफलमध्‍ये कांस्‍य पदक जिंकून भारताला लंडन ऑलिम्पिकमध्‍ये पहिले पदक मिळवून देणारा गगन नारंगने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्‍ये निराशा केली. या स्‍पर्धेत त्‍याला पात्रता फेरीही पूर्ण करता आली नाही. त्‍याच्‍याबरोबर भारताचा आणखी एक नेमबाज संजीव राजपूतदेखील बाहेर पडला. नारंग 20 व्‍या तर राजपूत 26 व्‍या स्‍थानी राहिले.
संधूनेही केली निराशा
नेमबाजीत मानवजित सिंग संधूने निराश केली. ट्रॅप स्‍पर्धेत त्‍याला पात्रता फेरीही पूर्ण करता आली नाही. दोन दिवस पात्रता फेरीचे सामने चालले. मात्र बेकार प्रदर्शनामुळे तो 11 व्‍या स्‍थानी राहिला.
आणखी एक अ‍ॅथलीट बाहेर
जाणून-बुजून खराब खेळ केल्‍याच्‍या आरोपाखाली अल्‍जेरियाच्‍या तौफिक मखलोफीला ऑलिम्पिकमधून बाहेर करण्‍यात आले आहे. यापूर्वी बॅडमिंटनमधील आठ जणांना याच कारणासाठी बाहेरचा रस्‍ता दाखवण्‍यात आले होते.
रविवारी मखलोफीने 1500 मीटर सेमीफायनलमध्‍ये विजय मिळवला होता. मात्र शिल्‍लक वेळ असूनही त्‍याचे नाव 800 मीटर स्‍पर्धेतून काढण्‍यात आले नव्‍हते. त्‍यामुळे त्‍याल 800 मीटरमध्‍ये भाग घ्‍यावा लागला. या स्‍पर्धेत त्‍याने फक्‍त 200 मीटरच पार केले.
याविषयी आंतरराष्‍ट्रीय अ‍ॅथलीट फेडरेशनने नाराजी व्‍यक्‍त करताना मखलोफीला स्‍पर्धेबाहेर केले.
चरस आणि गांजा
चरस आणि गांजाचे सेवन केल्‍याप्रकरणी अमेरिकेचा ज्‍युडो खेळाडू निकोलस डेलपोपोलोला ऑलिम्पिकमधून बाहेर करण्‍यात आले आहे. आपल्‍याकडून असे चूकीने झाले असल्‍याचे म्‍हणत, निकोलसने आपली चूक मान्‍य केली आहे. ज्‍युडोमध्‍ये तो 73 किलो ग्रॅम वजनी गटात सातव्‍या स्‍थानी होता.
OLYMPIC: विजेंद्रचा पराभव, सायनाचे मायदेशात जंगी स्‍वागत
LONDON OLYMPIC : बोल्ट पृथ्वीवरचा वेगवान मानव
LONDON OLYMPIC : ‘छुपा रुस्तम’ संबोधल्याने विजय नाराज
LONDON OLYMPIC : ‘डोपिंगचा डाग पुसला गेला’
LONDON OLYMPIC : कुस्तीतील पहिले सुवर्ण इराणला
LONDON OLYMPIC : क्षमतेवरील प्रश्नचिन्ह योग्य क्षणी मिटवल्याचा आनंद : मुरे
LONDON OLYMPIC : चीनकडून पुन्हा अव्वल स्थान खेचण्यासाठी अमेरिकेची शर्थ
OLYMPIC: लंडन ऑलिम्पिकमधील \'एम\' फॅक्‍टर
OLYMPIC: तिकिटासाठी काहीही करणारा अवलिया