आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OLYMPIC सहावा दिवस: भारतीय बॅडमिंटनचा नवा स्‍टार आणि रॉजर फेडररला 'दे धक्‍का'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- हिट
बॅडमिंटनचा नवा स्‍टार
पी. कश्‍यप भारतीय बॅडमिंटनचा नवा स्‍टार म्‍हणून उदयास येत आहे. कोणी विचारही केला नव्‍हता की तो ऑलिम्पिकच्‍या उप-उपांत्‍य फेरीत जागा मिळवेल. उप-उपांत्‍य पूर्व फेरीचा सामना जरी तीन गेमपर्यंत लांबला तरी कश्‍यपचा दृढनिश्‍चय दिसून येत होता. तो आणखी कुठेपर्यंत जाईल हे सांगता येत नाही. मात्र एवढे निश्चित आहे की भारतीय बॅडमिंटनचा तो उभरता स्‍टार आहे.
सातवे ऑलिम्पिक पद
सायकलिंग टाइम ट्रायलमध्‍ये सुवर्ण पदक जिंकून ब्रिटनच्‍या ब्रॅडली विगिन्‍सने नवा विक्रम बनवला आहे. त्‍याने ब्रिटनला व्रिकमी सात वेळा ऑलिम्पिक पदक पटकावून दिले. विगिन्‍सने ब्रिटनसाठी चार सुवर्ण, दोन रौप्‍य आणि एक कास्‍य पदक मिळवून दिले आहे. यापेक्षा आणखी चांगले काहीही असू शकत नाही, असे त्‍याने सुवर्ण पदक जिंकल्‍यानंतर म्‍हटले.
रेबेका सोनीला सुवर्ण
अमेरिकेच्‍या रेबेका सोनीने 200 मीटर ब्रेस्‍टस्‍ट्रोकमध्‍ये नवा विश्‍वविक्रम बनवला आहे. तिने 2.20.00 मिनिटांचा वेळ घेतला. मेहनतीचे फळ मिळाले अशी प्रतिक्रिया तिने सुवर्ण पदक जिंकल्‍यानंतर दिली.
100 मीटर फ्री-स्‍टाईल जलतरणपटू
अमेरिकेच्‍या नॅथन ऍड्रियनने चुरशीच्‍या लढतीत पुरूषांच्‍या 100 मीटर फ्री-स्‍टाईलमध्‍ये सुवर्ण पदक जिंकले. सामना इतका रोचक होता की, ऑस्‍ट्रेलियाचा जागतिक चॅम्पियन जेम्‍स मॅग्‍नुसेन फक्‍त 0.01 सेकंदांनी पराभूत झाला.
50 मीटरपर्यंत ऍड्रियन तिस-या क्रमांकावर होता. मात्र त्‍यानंतर त्‍याने चपळता दाखवली. कॅनाडाचा ब्रेंट हेडेन तिस-या क्रमांकावर राहिला.
इजिप्‍त आणि ब्राझील फुटबॉल उप-उपांत्‍य फेरीत
इजिप्‍त आणि ब्राझीलचा संघ फुटबॉलमध्‍ये उप-उपांत्‍य फेरीत पोहोचला. इजिप्‍तने बेलारूसला 3-1 ने हरवले. तर ब्राझीलने न्‍यूझीलंडचा 3-0 ने सहज पराभव केला. उप-उपांत्‍य फेरीत आता इजिप्‍तचा सामना जपानशी तर ब्राझीलचा होंडुरास संघाशी होईल.
मिस
हॉकीमध्‍ये पुन्‍हा पहिले पाढे
भारतीय हॉकी संघ सध्‍या खूप वाईट स्थितीतून जात आहे. त्‍यांना सलग दुस-या सामन्‍यात पराभव स्‍वीकारावा लागला. न्‍यूझीलंड विरूद्धच्‍या सामन्‍यात चांगली सुरूवात करूनही संघाला पराभूत व्‍हावे लागले. न्‍यूझीलंडने भारताला 3-1 ने हरवले. आता लंडन ऑलिम्पिकमधील भारतीय हॉकीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे.
पदकापासून कोसो दूर दीपिका
माझ्यावर कोणताच दबाव नव्‍हता, फक्‍त वातावरणाने खेळावर परिणाम झाला. भारतात असे वातावरण मिळत नाही, असे जागतिक क्रमवारीत नंबर एकवर असलेली दीपिकाकुमारी म्‍हणते. दीपिकाकुमारीकडून या ऑलिम्पिकमध्‍ये मोठी अपेक्षा होती. मात्र पदक तर लांब तिला एकही सामना जिंकता आला नाही. सांघिक स्‍पर्धेनंतर वैयक्तिक स्‍पर्धेतही तिचा पत्ता साफ झाला.
रॉजर फेडरर आणि स्‍टेनिसलास वावरिन्‍का जोडीचा पराभव
टेनिसमधील जागतिक क्रमवारीत नंबर एकवर असलेला स्वित्‍झर्लंडचा रॉजर फेडरर आपला सहकारी स्‍टेनिसलास वावरिन्‍काबरोबर दुहेरीच्‍या सामन्‍यात पराभूत झाला. इस्‍त्रायलचे अँडी राम आणि जोनाथन इलरिच या जोडीने सहाव्‍या क्रमांकावरील फेडरर आणि वावरिन्‍का जोडीचा पराभव केला.
फेडरर आणि वावरिन्‍काने पहिला सेट 6-1 न जिंकला होता. मात्र दुसरा सेट ट्रायबेकरमध्‍ये त्‍यांना गमवावा लागला.
पेस-वर्धनचा पराभव
दुहेरी सामन्‍यात भारताच्‍या लियांडर पेस आणि विष्‍णु वर्धनला पराभवामुळे बाहेर पडावे लागले. फ्रान्‍सच्‍या लोड्रा आणि त्‍सोंगा जोडीने भारतीय जोडीपेक्षा चांगला खेळ केला. पहिला सेट गमावल्‍यानंतर पेस आणि वर्धन जोडीने दुसरा सेट जिंकून आशा जागृत केल्‍या होत्‍या. मात्र तिस-या सेटमध्‍ये लोड्रा आणि त्‍सोंगाने त्‍यांना संधीच दिली नाही.
जाणूनबुजून हारले आणि ऑलिम्पिकमधून बाहेर पडले
जाणूनबुजून हारल्‍यामुळे आठ बॅडमिंटन महिला खेळाडूंना ऑलिम्पिकमधून बाहेर व्‍हावे लागले आहे. ज्‍यांच्‍यावर असे आरोप करण्‍यात आले होते. यामध्‍ये चीनच्‍या दोघांचा समावेश आहे. जागतिक बॅडमिंटन फेडरेशनच्‍या या निर्णयाची ऑलिम्पिकमध्‍ये चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणाची वेगळी चौकशी करण्‍याची मागणी चीनने केली आहे.
OLYMPIC पाचवा दिवस: देवेंद्रो सिंगचा दम तर भूपती-बोपण्‍णाची हार
OLYMPIC चौथा दिवस: सायनाची घौडदौड सुरूच तर सांगवान ठरला दुर्दैवी
OLYMPIC तिसरा दिवस: ज्‍वालाचा राग आणि सायनाचा विजय