आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Olympic Medallist Vijay Kumar Wants To Quit Indian Army ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : ‘छुपा रुस्तम’ संबोधल्याने विजय नाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - लंडन ऑलिम्पिक 25 मीटर रॅपिड फायर नेमबाजी स्पर्धेत देशाला रौप्यपदक जिंकून देण्याचा पराक्रम करणा-या भारतीय नेमबाज सुभेदार विजयकुमारच्या मनात आपल्यावर कधी कॅमे-यांचा लखलखाट झाला नसल्याचा सल कायम आहे. पदक विजयाची कुवत असूनही नेहमीच अंडरडॉग्ज ठरवल्याने तो दुखावला गेला आहे. भारतीयांना त्याच्याबद्दल अधिक माहिती नसल्यानेही विजय नाराज आहे. मी आतापर्यंत 45 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत, तरीही प्रसारमाध्यमांनी मला जास्त कव्हरेज दिले नसल्याचे तो म्हणतो.
पत्रकारांशी संवाद साधताना विजय म्हणाला, भारतातून मला फोनवर फोन येत आहेत. अनपेक्षित पदक मिळवल्याबद्दल ते मला छुपा रुस्तम संबोधत आहेत, त्यांना माझ्याबद्दल माहिती हवी आहे. हे सर्व बघून मला काहीसे वाईट वाटते. मात्र आता हा माझ्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. 26 वर्षांच्या विजयने पुढे सांगितले की, मी माझ्या क्रीडा प्रकारात 2004पासून ते आतापर्यंत एकमेव राष्ट्रीय चॅम्पियन आहे. मेलबोर्न राष्ट्रकुल स्पर्धेत नव्या विक्रम नोंदवत मी दोन सुवर्णपदके जिंकली होती. यानंतर दोहा एशियाडमध्येही एक सुवर्ण, एक कांस्य, चीनमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत एक रौप्य, दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सुवर्ण व एक रौप्य, ग्वांगझू एशियाडमध्ये दोन कांस्यपदकांची कमाई माझ्या नावावर आहे. तरीही लंडनमध्ये मी जिंकलेले पदक सर्वांना आश्चर्यचकित करून टाकत असेल तर माझाही त्याला इलाज नाही. येता जाता प्रत्येकाला माझे यश व पदके सांगणे हे माझे काम नाही. मी सैनिक आहे, कोणी जनसंपर्क कर्मचारी नाही, माझे लक्ष्य केवळ माझ्या खेळावर असते, असेही विजय म्हणाला.
लष्कराची नोकरी सोडणार - राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने उत्तम कामगिरी करुनही गत सहा वर्षांमध्ये मला एकदाही बढती मिळालेली नाही. त्यामुळे लष्करातील माझी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे रौप्यपदक विजेता विजयकुमार याने सांगितले. विजयकुमार 16 डोग्रा रेजिमेन्टमध्ये सध्या सुभेदार पदावर कार्यरत आहे.