आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC : लंडनमध्ये आणखी एका भारतीय मुष्टीयोद्धावर अन्याय ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ऑलिम्पिकमध्ये भारताच्या आणखी एका बॉक्सरवर अन्याय झाल्याची माहिती आहे. बॉक्सिंगच्या क्वार्टर फायनलमध्ये ब्रिटनच्या थॉमस स्टॉकर कडून पराजीत झालेल्या मनोज कुमारचे म्हणणे आहे की, त्याच्यासोबत 'चीटिंग' करण्यात आली. याआधी भारताचा मुष्टीयोद्धा सुमित सांगवान आणि विजय कृष्णन यांना वादग्रस्त लढतीत पराभूत ठरवले होते.
ऑलिम्पिकमध्ये आज
हॉकी
आज भारत विरुद्ध कोरिया हॉकी सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ६.१५ ला हा सामना होणार आहे.
बॉक्सिंग
महिला लाईटवेट ५१ किलो वजनी गटात राउंड ऑफ १६ एम.सी.मेरी कोम विरुद्ध एम. कोरोलिना (पोलंड) यांच्यात सायंकाळी ६.३० ला लढत होईल.

भारताची महिला बॉक्सर मेरी कोम रविवारपासून आपल्या ऑलिम्पिक अभियानाला सुरुवात करणार आहे. पाच वेळची विश्वविजेती मेरी कोमचा सलामीचा सामना पोलंडची कॅरोलिना मिशेलजुकविरुद्ध खेळवला जाणार आहे. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या मेरी कोमला 51 किलो वजन गटात पदक मिळवण्यासाठी दोन लढती जिंकाव्या लागतील. विजयी सलामीनंतर तिला उपांत्यपूर्व फेरीत ट्युनिशियाच्या रहालीविरुद्ध खेळावे लागणार आहे. या सामन्यातील विजयाने उपांत्य फेरी गाठणा-या मेरी कोमला दुस-या मानांकित निकोलाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
LONDON OLYMPIC : ‘फुल’राणीला कांस्यपदक !
‘गोल्डन’ स्लॅम; फायनलमध्ये सेरेनाने शारापोवाला हरवले
घणाघाती देवेंद्रो; उपांत्यपूर्व फेरीत दे दणादण प्रवेश
OLYMPIC: भारताची कृष्‍णा पुनिया अंतिमफेरीत