आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...आणि कॅमे-याने कैद केली ऑलिम्पिकमधील सर्वात लज्‍जास्‍पद घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- लंडनमध्‍ये वादग्रस्‍त प्रकरणांचा सिलसिला सुरूच आहे. पहिल्‍यांदा मॅच फिक्सिंग आणि आता वॉटर पोलो खेळातील एका खेळाडूबरोबर अशीच घटना घडली आहे. विशेष म्‍हणजे लाखो लोकांनी टीव्‍हीवर होणा-या थेट प्रसारणात ही घटना पाहिली.
अंडरवॉटर पोलो सामन्‍यात पाण्‍याच्‍या खाली लावण्‍यात आलेल्‍या कॅमे-याने करण्‍यात आलेले चित्रीकरण पाहणारे सर्वजण खजील झाले होते. सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार स्‍पेन आणि अमेरिकेच्‍या खेळाडूंमध्‍ये सुरू असलेल्‍या वॉटर पोलो सामन्‍यामध्‍ये अमेरिकन खेळाडूच्‍या खांद्यावरून कपडे सरकले. त्‍यामुळे तिथे उपस्थित असलेल्‍या प्रेक्षकांमध्‍ये गडबड सुरू झाली.
पाण्‍यामध्‍ये स्‍पेन आणि अमेरिकेच्‍या खेळाडूंमध्‍ये झटापट झाली. स्‍पॅनिश खेळाडूने अमेरिकेच्‍या खेळाडूचा स्‍वीम सूट ओढला. परंतु, ज्‍या वाहिनीने याचे थेट प्रक्षेपण केले त्‍यावरच आता टीका करण्‍यात येत आहे.