आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Olympics 2012: Bolt Must Find His Best To Repel Rivals ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : 9.58 सेकंद...की त्यापेक्षा कमी?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन ऑलिम्पिकमध्ये 100 मीटरच्या शर्यतीत सर्वश्रेष्ठ कोण असेल, याचा निर्णय रविवारी मध्यरात्री लागेल. सुवर्णपदक जमैकाचे असेल की अमेरिकेचे...हे पाहणे रोमांचक ठरेल. जमैकाचे युसेन बोल्ट, योहान ब्लॅक, अमेरिकेचे टायसन गे आणि जस्टिन गॅटलिन या वेळी सुवर्णपदक जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. 100 मीटर शर्यतीची फायनल रविवारी रात्री 2.20 वाजता होईल.
ब्लॅक देणार बोल्टला आव्हान ?
सध्या सर्वाधिक चर्चेत आहे तो योहान ब्लॅक. त्याने जमैकाच्या टीम निवडीदरम्यान ऑलिम्पिक ट्रायलमध्ये तीन दिवसांत दोन वेळा आपला सीनियर युसेन बोल्टला हरवले होते. ट्रायलला विजय किंवा पराभवाचे मापदंड मानू नये, असे यावर बोल्टचे मत आहे. आम्ही देशासाठी खेळतो आणि 100 टक्के योगदान देतो, असेही तो म्हणतो.
कोण देणार सर्वश्रेष्ठ वेळ ?
9.75 सेकंद ब्लॅकचा सर्वश्रेष्ठ वेळ आहे. ही कामगिरी त्याने याच वर्षी किंगस्टन येथे केली होती.
9.58 सेकंद बोल्टचा सर्वश्रेष्ठ वेळ आहे. ही कामगिरी त्याने 2009 मध्ये केली होती. हा विश्वविक्रम आजही कायम आहे.
काय आहे समानता ?
दोन्ही खेळाडू जमैकाचे असून एकच क्लब रेसर अ‍ॅथलेटिक्स क्लब किंगस्टन जमैका येथे सराव करतात. दोघांचे कोच ग्लेन मिल्स आहेत. दोन्ही खेळाडू अ‍ॅथलेटिक्स क्लब किंगस्टन येथे प्रशिक्षण घेतात.
फरक काय आहे ?
बोल्ट बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 100 मी. शर्यतीचा चॅम्पियन आहे. तो पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिला आहे.
ब्लॅक 2011 चा वर्ल्ड चॅम्पियन आहे. ऑलिम्पिकमध्ये तो पहिल्यांदा सहभागी होत आहे.
बोल्ट इतिहास रचू शकतो
युसेन बोल्ट 9.4 सेकंदात 100 मी. शर्यती पूर्ण करून नवा इतिहास रचू शकतो. त्याला वातावरणाने मदत केली तर तो येथे नवा इतिहास रचण्यास सक्षम आहे. - सेबेस्टियन को, लंडन ऑलिम्पिक आयोजन समितीचे प्रमुख.
दोघेही माझे शिष्य - बोल्ट, ब्लॅक दोघेही माझे शिष्य आहेत. त्या दोघांमध्ये डावे - उजवे ठरवणे अवघड आहे. रविवारी दोघांत जोरदार झुंज होईल. मात्र, पदक तर जमैकाकडेच येईल. - ग्लेन मिस्ल, कोच.