आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Olympics 2012: Usain Bolt Still The Fastest Of All! ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : युसेन बोल्टने जिंकली 100 मीटरची शर्यत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जगातील नंबर एक धावपटू जमैकाचा युसेन बोल्टने ऑलिम्पिकमधील प्रतिष्टेची 100 मीटर शर्यत रविवारी जिंकली. त्याने 100 मीटरचे अंतर 9.63 सेकंदात मध्ये पुर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले. या वेळी त्याने कट्टर प्रतिस्पर्धी योहान ब्लेक, जस्टीन गॅटलीन व टायसन गे या अव्वल धावपटूंना पिछाडीवर टाकले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य स्पर्धेत बोल्टने 9.87 सेंकदांत शर्यत जिंकून फायनलमध्ये धडक मारली होती. तसेच ब्लेक (9.85), अमेरिकेचा गॅटलीन (9.82) यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला. या वेळी रेयान बॅली, टायसन गे, मार्टिन चौरांडी, असाफा पॉवेल, रिचर्ड थांपसनसह आठ जणांनी अंतिम फेरी गाठली होती. युसेनच्या नावे विश्वविक्रम नोंद आहे. त्याने 16 ऑगस्ट 2009 मध्ये बíलन येथे 100 मीटरची स्पर्धा 9.58 सेंकदांमध्ये जिंकली होती. तसेच 16 ऑगस्ट 2008 मध्ये बीजिंग येथे 9.69 चा ऑलिम्पिक विक्रम त्याने केला होता.
LONDON OLYMPIC : शेली ठरली वेगवान महिला