आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Olympics Boxing: Devendro Singh Wins; Storms Into Quarterfinals ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : घणाघाती देवेंद्रो; उपांत्यपूर्व फेरीत दे दणादण प्रवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारताचा देवेंद्रोसिंहने आपल्या घणाघाती ठोशांची बरसात करत दणक्यात ऑलिम्पिक बॉक्सिंगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. देवेंद्रोने लाइट फ्लायवेट (49 किलोग्रॅम) गटात मंगोलियाच्या सेरदंबा पुरेवडोर्जला 16-11ने हरवले. यापूर्वी विजेंदरनेही अंतिम आठमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. उपांत्यपूर्व फेरीत देवेंद्रोची लढत आयर्लंडच्या पॅडी बार्नेसविरुद्ध होणार आहे. देवेंद्रोने हा सामना जिंकला तर तो उपांत्यफेरीत पोहोचेल. याबरोबर त्याचे किमान कांस्यपदकही निश्चित होईल. आयरिश खेळाडूने कॅमेरुनच्या थॉमस एसोंबाला 15-10ने नमवले.
पहिल्या राऊंडमध्ये घेतली आघाडी : मणिपूरच्या देवेंद्रोने पहिला राऊंड 4-3 जिंकत प्रारंभीच आघाडी घेतली होती. देवेंद्रोने आपल्या पहिल्या लढतीत होंडुरासच्या बॅरोन मोलिनाना नॉक आऊट केले होते. या विजयाने उत्साहित झालेल्या देवेंद्रोने उप-उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाच्या बॉक्सरला दणादण ठोसे मारत बॅकफूटवर पाठवले.
दुस-या राऊंडमध्ये 4-2ने विजय : देवेंद्रोने दुसरा राऊंड 4-2ने जिंकत आघाडी 8-5 अशी मजबूत केली.
तिस-या राऊंडमध्ये आघाडी कायम : तिस-या राऊंडमध्येही देवेंद्रोने आपली आघाडी कायम ठेवली. सेरदंबाने त्याच्यावर प्रहार करण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न केले.