आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Olympics Day 8 India Hopes Medal From Saina To Appeal For Vikas

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC : सायनाकडून मेडलची अपेक्षा, विकाससाठी भारत करणार अपिल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ऑलिम्पिकच्या बॅडमिंटन स्पर्धांत महिला एकेरीत येथे चीनच्या जिन वांगने दुखापतीमुळे सामना सोडल्याने भारताच्या सायना नेहवालला कांस्यपदक मिळाले. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी सायना भारताची पहिली बॅडमिंटनपटू ठरली आहे. कांस्यपदकासाठी सामना थांबला त्यावेळी सायना 18-21, 0-1 ने मागे पडली होती. सायनाच्या चालीत विजयाचा आनंद दिसत नव्हता. मात्र, तिच्या कांस्यपदकामुळे स्टेडियममध्ये अनेकांच्या हातात तिरंगा झळकत होता. कसे का होईना...अखेर पदक जिंकण्याचे सायनाचे स्वप्न पूर्ण झाले.
भारतासाठी लंडन ऑलिम्पिकमध्ये हे तिसरे पदक ठरले. यापूर्वी नेमबाज विजयकुमारने रौप्य आणि नेमबाज गगन नारंगने कांस्यपदक जिंकले आहे. यासह भारताने मागच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये तीन पदक जिंकण्याच्या आपल्या सर्वश्रेष्ठ कामगिरीशी बरोबरी केली.
सायनाची डळमळीत सुरुवात - कांस्यपदकासाठी सायनाची सुरुवात डळमळीत झाली. जिन वांगने सायनाला चुका करण्यास भाग पाडून सलग गुण मिळवले. सायनाने पुनरागमनाचे प्रयत्न केले आणि गेम पॉइंटपर्यंत पोहोचलेल्या वांगला चुका करण्यास भाग पाडले. सायनाने 18-20 असा स्कोअर केला. यादरम्यान एक ओव्हरहेड स्मॅश मारण्याच्या नादात चिनी खेळाडूच्या पायांचे स्नायू दुखावले गेले. तिला वेदना असह्य झाल्या. तिने कोर्टवर उपचार घेतले आणि पायाला पट्टी बांधून ती पुन्हा खेळण्यास सज्ज झाली. पुढचा गुण मिळवत तिने पहिला गेम 21-18 ने जिंकला. मात्र, तिच्यासाठी सामन्यात पुढे खेळणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले.
दुस-या गेममध्येही सायना मागे - वांगने दुस-या गेमचा पहिला गुण मिळवला. मात्र, पुन्हा पायात वेदना सुरू झाल्या. आता आपण सामन्यात पुढे खेळू शकत नाही, असा इशारा तिने केला. त्यावेळी सायना चिनी खेळाडूच्या जवळ उभी होती. तिने जिंग वांगशी हात मिळवले आणि आपली बॅग उचलून ती कोर्टबाहेर गेली.
सायनाला हरवणारी हरली - सेमीफायनलमध्ये भारतीय खेळाडू सायनाला हरवणारी चीनची खेळाडू यिहान वांगला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये चीनच्या ली जुईरुईने आपल्याच देशाच्या यिहान वांगला 21-17, 23-21, 21-15 ने पराभूत करुन सुवर्ण जिंकले.
मला असे पदक नको होते... - मला असे पदक नको होते, असे सायनाने सामना संपल्यानंतर सांगितले. मला जिंकायचे होते. तरीही पदक हे पदकच असते, असे मी म्हणेन. या पदकामुळे भारतात बॅडमिंटनचे चित्र बदलण्यास मोठी मदत होईल.
हैदराबादला जाऊन चॉकलेट खाणार... - माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप चॉकलेट तयार ठेवले आहेत. मी पदक जिंकले तरच ते मला चॉकलेट देणार होते. आता मी हैदराबादला परतून सर्वांत आधी चॉकलेट खाणार.
बक्षिसांचा पाऊस
* 2 किलो सोन्याचे मेडल सहारा समूह देणार
* 20 लाख रुपये क्रीडा मंत्रालयाकडून.
* 1 कोटी रुपये तामिळनाडू शासनाकडून.
* 1 कोटी रुपये हरियाणा शासन देणार.
* 15 लाख रुपये सॅमसंग देणार.
* 15 लाख रुपये ओएनजीसी देणार.
* 20 लाख रुपये भारतीय सेनेकडून.
2012 मध्ये सायनाने तीन किताब जिंकले
1. स्विस ओपन विजेता
2. थायलंड ओपन विजेता
3. इंडोनेशियन ओपन विजेता
अशी केली तयारी
पुलेला गोपीचंद अकादमीत बीजिंग ऑलिम्पिकनंतर सलग सराव केला.
एक्स्पोजरसाठी अधिकाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
भारताशी धोका, विकासला विजयानंतरही पराभूत घोषित केले