आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Olympics Hockey: India Crash To Fifth Successive Defeat ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑलिम्पिकच्या इतिहासात हॉकीमध्ये भारताची आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - एकेकाळी 8 सुवर्णपदकांसह हॉकीचा अनिभिषिक्त सम्राटपदाचा इतिहास असलेल्या भारताला मंगळवारी लंडन ऑलिम्पिकमध्ये लाजिरवाण्या वर्तमानाला सामोरे जावे लागले. पाचव्या व शेवटच्या सामन्यात बेल्जियमने भारताला 3-0 ने धुतले. भारतीय संघ आता 11 आणि 12 व्या स्थानासाठी अ गटातील अंतिम स्थानावरील दक्षिण आफ्रिकेसोबत ‘लढेल’.
या पराभवासह हॉकी संघाचे ऑलिम्पिकमधील अभियान संपुष्टात आले. या विजयानंतर बेल्जियमची टीम ब गटात तिसर्‍या स्थानावर पोहोचली. बेल्जियमकडून जेरोम डेकेसरने 15 व्या, बोकार्ड गॉथियरने 47 व्या तर टॉम बूनने 67 व्या मिनिटाला गोल केले. स्पध्रेत हा पहिला असा सामना ठरला ज्यात भारताकडून एकही गोल होऊ शकला नाही.
खर्च 18 कोटींचा, फायदा दमडीचा - खास लंडन ऑलिम्पिकच्या तयारीसाठी मार्च 2011 पासून भारतीय हॉकी संघावर क्रीडा मंत्रालयाने तब्बल 18.09 कोटी रुपयांचा खर्च केला. परदेशी खेळण्याचा सराव व्हावा म्हणून यंदा फक्त फेब्रुवारीपर्यंत पुरुष हॉकी संघावर 9.86 कोटी तर महिला संघावर 5.53 कोटी रुपये खर्च करण्यात आले. प्रशिक्षण शिबिरांवर सुमारे 3.25 कोटी रुपये खर्चण्यात आले. ऑलिम्पिकसाठी 48 खेळाडूंचा प्राथमिक संघ निवडण्यात आले होते. त्यांच्यासाठी 6 प्रशिक्षक आणि सहा सहायक कर्मचारी दिमतीला होते.