आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Olympics: Kirani James Romps To Historic 400m Gold ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : ग्रेनेडा देशाला मिळाले पहिले पदक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ग्रेनेडा देशाच्या किरानी जेम्सने 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावत त्यांच्या देशाला आजपर्यंतचे पहिले पदक मिळवून दिले. त्याच्या या पदकाने ग्रेनेडामध्ये जल्लोष करण्यात आला.
ग्रेनेडाच्या किरानी या धावपटूने ही स्पर्धा 43.94 अशा विक्रमी वेळेत पूर्ण केली आहे. त्यातही अखेरच्या दीडशे मीटरचे अंतर त्याने अत्यंत वेगाने कापले आहे. त्यामुळे भविष्यातील छोट्या पल्लयाच्या स्पर्धांमध्ये तो दावेदारी करु शकतो, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. या विजयामुळे माझ्या देशवासियांना माझा अभिमान वाटला असेल असेही किरानी याने नमूद केले.
अमेरिकेची 400 मीटरमधील दादागिरी संपुष्टात - 1980 सालानंतर अमेरिकेव्यतिरिक्त अन्य देशाच्या पहिल्याच धावपटूने अर्थात किरानी जेम्सने ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी करुन दाखविली आहे. दरम्यान पुरुष आणि महिलांच्या 100 मीटरमध्ये जमैकाच्या खेळाडूंनी आधीपासूनच अमेरिकेचे वर्चस्व मोडून काढले. त्यानंतर 200 मीटरमध्येदेखील जमैकन खेळाडूंचाच दबदबा असून 400 मीटरमध्येही अमेरिकेची मक्तेदारी या ऑलिम्पिकमध्ये मोडली गेली आहे.
देशात सुरू असेल जल्लोष - माझ्या यशामुळे ग्रेनेडाला पहिलेच ऑलिम्पिक पदक प्राप्त झाले आहे. मी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करू शकलो, त्याबाबत मला अभिमान आहे. माझ्या देशात सध्या सर्व नागरिक जल्लोष करीत असतील. शर्यत पूर्ण करण्यासाठी या वेळी 44 सेकंदांपेक्षाही कमी वेळ लागल्याने मी योग्य पद्धतीने धावत असल्याचे मला समाधान आहे. - किरानी जेम्स
किरानी जेम्स तोडू शकतो विश्वविक्रम - किरानी जेम्स हा माझा 43.18 हा विश्वविक्रम नक्कीच मोडू शकतो, असा मला विश्वास वाटतो. तो ज्या पद्धतीने पळाला, ते पाहता तो भविष्यात छोट्या पल्ल्याच्या शर्यतीतही प्रमुख दावेदार ठरू शकतो. - मायक ल जॉन्सन, माजी विश्वविक्रमी धावपटू