आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेळा पूर्वी केलेला सेक्स जास्त मेडल मिळवून देतात का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - मैदानात उतरण्यापूर्वी सेक्स केल्याने आपल्या खेळावर परिणाम होईल अशी खेळाडूंची समजूत होती. पण, असे केल्याने खेळावर त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचे संशोधन करणार्‍या काही व्यक्तींचे मत आहे.
प्रसिध्द बॉक्सिंगपटू मोहम्मद अली त्याच्या सामन्याच्या सहा आठवडे आधीपासून सेक्स करणे बंद करत होता.
1998 साली झालेल्या फुटबॉल विश्वचषकाच्यावेळी इंग्लंडचे प्रशिक्षक ग्लेन हॉडल यांनी खेळाडूंना तब्बल एक महिना सेक्स न करण्याची बंदी घातली होती. या सारखेच अनेक उदाहरण सांगता येतील ज्यामध्ये महत्वाच्या लढती आधी एक रात्र सेक्स करण्यास निर्बंध घालण्यात आले होते.
'क्लिनिकल जर्नल ऑफ़ स्पोर्ट्स मेडिसिन' मध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार सामन्यापूर्वीच्या रात्री सेक्स केल्याने त्याचा शरिराच्या क्षमतेवर कुठलाच परिणाम दिसून येत नाही.
परिक्षण -
लग्न झालेल्या 14 पुरूष अँथलेट असणार्‍यांच्या मासपेशींचे सेक्सनंतर दुसर्‍या दिवशी परिक्षण केले गेले
यानंतर त्यांचे सहा दिवसानंतर दुसर्‍यांदा पुन्हा परिक्षण केले गेले पण त्यांच्या सहनशिलतेमध्ये आणि मासपेशींमध्ये कुठलाच परिणाम झालेला नव्हता.
1995 मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनावरील एक लेख छापण्यात आला होता त्यानुसार फिटनेसच्या चाचणीपूर्वी 12 तास आधी केलेल्या सेक्समुळे पल्स किंवा रक्तदाबावर काही विशेष फरक झाल्याचे निदर्शनात दिसून आले नाही.
जर एकाद्याने रात्रभर सेक्स केला तर सहाजिक अँथलिटला पुरेशी झोप मिळणार नाही आणि त्याचा परिणाम त्याच्या खेळावर पडू शकतो. पण, कमी कालावधीसाठी करण्यात आलेल्या सेक्सचा त्याच्या खेळावर काही परिणाम होणार नाही. असे मत युनिवर्सिटी ऑफ सरेच्या मार्टिन यांनी मांडले आहे.
PHOTOS: लंडन ऑलिम्पिकचे सेक्‍सी अंदाज