आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OLYMPIC आठवा दिवस: नेमबाजीत भारताचा सोनेरी 'विजय' तर फेडररचा विक्रमी 'संघर्ष'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिट
लंडन ऑलिम्पिकमध्‍ये तीन ऑगस्‍टचा दिवस भारतासाठी संस्‍मरणीय ठरला. विजयकुमारने सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का देताना 25 मीटर रॅपिड फायर पिस्‍तूल प्रकारात भारताला रौप्‍य पदक मिळवून दिले.
विजयकुमारकडून कोणीही अशा चमत्‍काराची अपेक्षा केली नसेल. तसं पाहिलंतर विजयकुमारने नेमबाजीत पहिल्‍यापासूनच चांगले प्रदर्शन केले आहे. पण जेव्‍हा ऑलिम्पिकबाबत बोलले जाते तेव्‍हा या उपलब्‍धीचे महत्‍व काही वेगळेच असते. नेमबाजीत अभिनव बिंद्रा, रंजन सोढी आणि जयदीप कर्माकर पदकापासून दूर गेल्‍यानंतर विजयच्‍या विजयाने भारतीय दलात उत्‍साहाची लाट आली.
फेल्‍प्‍सची झोळी भरली
अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्‍प्‍सने लंडन ऑलिम्पिकमध्‍ये तिसरे सुवर्ण पदक पटकावले. फेल्‍प्‍सने 100 मीटर बटरफ्लाई प्रकारात सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. हे पदकाबरोबरच फेल्‍प्‍सने आपल्‍या खात्‍यात 21 पदकांची कमाई केली आहे. लंडन ऑलिम्पिकमध्‍ये त्‍याने तीन सुवर्ण आणि दोन रौप्‍य पदक मिळवले आहेत.
फेडरर झुंजणार मरेविरूद्ध
जगातील नंबर एकचा टेनिस खेळाडू स्वित्‍झर्लंडचा रॉजर फेडरर ऑलिम्पिक टेनिसच्‍या पुरूष एकेरीच्‍या फायनलमध्‍ये प्रवेश केला आहे. सुवर्ण पदकासाठी तो आता रविवारी लढणार आहे. मात्र सेमीफायनलमधील त्‍याची लढत सोपी नव्‍हती.
सेमीफायनलमध्‍ये हुआन मार्टिन डेल पोट्रोला पराभूत करण्‍यासाठी त्‍याला चार तास आणि 26 मिनिटे झुंजावे लागले. शेवटी त्‍याने 3-6, 7-6 (7-5) आणि 19-17 ने विजय मिळवला आणि शेवटी फायनलमध्‍ये जागा निश्चित केली.
फायनलमध्‍ये त्‍याची लढत ब्रिटनच्‍या अँडी मरेशी होणार आहे. अँडी मरेने सर्बियाच्‍या नोव्‍हाक जोकोविचला 7-5, 7-5 ने पराभूत केले.
सेरेना V/S शारापोव्‍हा
रशियाच्‍या मारिया शारापोव्‍हाने भलेही विंबल्‍डनमध्‍ये कमाल दाखवली नाही. मात्र ऑलिम्पिकमध्‍ये तिचे दिवस चांगले सुरू आहेत. तिने सेमीफायनलमध्‍ये मारिया किरिलेन्‍कोला पराभूत करून फायनलमध्‍ये जागा बनवली आहे. आता सुवर्णपदकासाठी ती अमेरिकेच्‍या सेरेना विलियम्‍सशी भिडणार आहे. सेरेना सध्‍या भलतीच फॉर्मात आहे.
विंबल्‍डन चॅम्पियन सेरेनाने सेमीफायनलमध्‍ये जगातील दुस-या क्रमांकाची खेळाडू बेलारूसच्‍या व्हि‍क्‍टोरिया अजारेन्‍काचा सरळ सेटमध्‍ये 6-1 आणि 6-0 ने मात केली.
मिस
हॉकीमध्‍ये पुन्‍हा एकदा...
ऑलिम्पिकमध्‍ये भारतीय हॉकी संघाची वाताहत झालेली दिसून येते. लागोपाठच्‍या तिन्‍ही सामन्‍यात भारताला पराभव स्‍वीकारावा लागला.
जर्मनीने भारताला 5-2 ने पराभूत केले. या पराभवामुळे भारताच्‍या सेमी फायनलमध्‍ये जाण्‍याचा आशा मावळल्‍या. निळया टर्फवर भारतीय हॉकी संघाला अडचणींचा सामना करावा लागली. संघामध्‍ये समन्‍वयाचा अभावही दिसून आला.
पराभवानंतरही होणार विजय?
भारतीय बॅडमिंटन स्‍टार साईना नेहवाल अजूनही पदकाच्‍या स्‍पर्धेतून बाहेर पडलेली नाही. मात्र सेमीफायनलमध्‍ये ती चीनची खेळाडू वांग यिहान हिच्‍याकडून पराभूत झाली. सेमीफायनलचा सामना तिच्‍यासाठी कमालीचा कठीण ठरला. सरळ सेट्समध्‍ये तिचा पराभव झाला.
परंतु, संपूर्ण स्‍पर्धेकडे पाहता लंडन ऑलिम्पिक तिच्‍यासाठी चांगलेच ठरले. तिने संपूर्ण ऑलिम्पिकमध्‍ये उत्‍कृष्‍ठ प्रदर्शन केले.
कांस्‍य पदकापासून थोडक्‍यात चुकला जयदीप
भारताचा नेमबाज जयदीप कर्माकर दुर्भाग्‍यशाली राहिला. 50 मीटर रायफल प्रोनमध्‍ये तो चौथ्‍या स्‍थानी राहिला. चांगल्‍या प्रदर्शनानंतरही कांस्‍य पदकापासून तो थोडा दूरच राहिला. पराभवनानंतर त्‍याने चांगले प्रदर्शन करू शकतो, असे म्‍हटले. याच स्‍पर्धेत गगन नारंग क्‍वॉलिफायसुद्धा करू शकला नाही. तो 18 व्‍या स्‍थानी राहिला.
पाकिस्‍तानचे हॉकी अभियान
हॉकीमध्‍ये पाकिस्‍तानच्‍या संघाला ब्रिटन संघाकडून 4-1 ने पराभव स्‍वीकारावा लागला. पराभव होऊनसुद्धा पाकिस्‍तानला सेमीफायनलमध्‍ये जाण्‍याची संधी आहे. पाकिस्‍तानी संघाने स्‍पेनला बरोबरीत रोखले होते. तर अर्जेंटीनाने त्‍यांना 2-0ने पराभूत केले होते. चार गुणांनी पाकिस्‍तान त्‍यांच्‍या गटात तिस-या स्‍थानी आहे.
OLYMPIC: भारताची कृष्‍णा पुनिया अंतिमफेरीत
OLYMPIC: सेंट्रल लंडन नव्हे, हे तर भुतांचे शहर!
OLYMPIC: भारतीय हॉकी संघाचा सलग तिसरा पराभव
OLYMPIC मसाला: लंडनमध्‍येही पसरलाय अंधश्रद्धेचा वास
OLYMPIC सातवा दिवस: साईना 'शायनिंग' तर जयवर 'भगवान' नाराज !