आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC दृष्‍टीक्षेपः फेडरर, सेरेना, शारापोवा उपांत्य फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विक्रमासह डॅनियलने जिंकले सोने
लंडन । हंगेरीचा जलतरणपटू डॅनियल ग्युर्ताने विश्वविक्रमासह 200 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक जिंकले. अथेन्स ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता डॅनियलने 200 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये दोन मिनिटे 07.28 सेकंदांचा वेळ काढला. इंग्लंडच्या मायकेल जेमिसनने 2.07.43 सेकंदांच्या वेळेसह रौप्य, तर जपानच्या रियो तातेशीने 2.08.29 सेकंदांसह कांस्यपदक जिंकले.
दक्षिण आफ्रिकेला रोइंगमध्ये सुवर्ण
लंडन। दक्षिण आफ्रिकेने ऑलिम्पिक रोइंगमध्ये गुरुवारी सुवर्णपदकाची कमाई केली. आफ्रिकेने रोइंगच्या हेविवेट चार प्रकारांत ही चमकदार कामगिरी करून दाखवली. आफ्रिकेच्या पुरुष संघाने सहा मिनिट 2.84 सेकंदात ही स्पर्धा जिंकली. इंग्लंड दुस-या क्रमांकावर राहिला, तर डेन्मार्कने कांस्यपदकावर धडक मारली.
नौकानयनात न्यूझीलंडचे यश
लंडन । वर्ल्ड चॅम्पियन नाथन कोहेन व जोसेफ सुल्लावान या दोघांनी गुरुवारी चमकदार कामगिरी करत न्यूझीलंडला ऑलिम्पिकच्या रोइंगमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. या जोडीने पुरुष दुहेरीत हे यश संपादन केले. इटलीच्या अलेस्सो सर्टाजी व रोमानो या जोडीने रौप्यपदकाची कमाई केली. सोल्वानियाच्या संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
फेडरर, सेरेना, शारापोवा उपांत्य फेरीत
लंडन। रॉजर फेडरर,सेरेना विल्यम्स व शारापोवा यांनी गुरुवारी ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. शारापोव्हाने किम क्लिस्टर्सवर 6-2, 7-5 ने हरवले. फेडररने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत अमेरिकेच्या जॉन इसनरला 6-4, 7-5 अशा फरकाने पराभूत केले. सेरेनाने आठव्या मानांकित कारोलिन वोझानिकीला 6-0, 6-3 ने धूळ चारली.
जांगमी किमने जिंकले सुवर्ण
लंडन। दक्षिण कोरियाच्या जांगमी किमने दोन ऑलिम्पिक चॅम्पियनला पराभूत करून 25 मीटर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले. 19 वर्षीय किमने 792.4 गुणांचा वेध घेतला. चीनच्या गत चॅम्पियन यिंग चेनला (791.2) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. युकेनची अथेन्स चॅम्पियन ओलेना कोस्तेविच कांस्यची मानकरी ठरली.
कोरियाच्या सिम जोंग रिमला सुवर्ण
लंडन । उत्तर कोरियाच्या 19 वर्षीय सिम जोंग रिमने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. 19 वर्षीय सिमने 261 किलो वजन उचलून हे पदक जिंकले. रोमानियाच्या रोक्साना डॅनियला काकोसला रौप्यपदक मिळाले. तिने 256 किलो वजन उचलले.