आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajwinder Kaur Wins Bronze In Womens Judo Event At Commonwealth Games

CWG पदक विजेतीच्या प्रेमाची आणि संघर्षाची कथा... खरे झाले पतीचे स्वप्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पति कुलविंदर सिंहसोबत महिला जुडो खेळाडू राजविंदर)

जालंदर - प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा हात असतो असे म्हणतात, मात्र राष्ट्रकुल खेळामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत असलेली महिला जुडो पटू राजविंदर कौर हिच्या यशामागे तिचा पती कुलविंदर सिंह याचा महत्त्वाचा वाटा असल्याचे कळते आहे. रविवारी राजविंदर कौरने राष्ट्रकुल खेळांमध्ये महिलांच्या 78 किग्रॅपेक्षा जास्त वजनच्या वर्गात जुडो स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले. त्यानंतर सोमवारी राजविंदरने आपल्या व पति कुलविंदर यांच्या प्रेमाची कथा सांगितली.

पीएपी (पंजाब आर्म्ड पोलिस) मध्ये कॉन्स्टेबल असलेला कुलविंदर सिंहने आपल्या पत्नीच्या यशासाठी तिच्या स्वप्नासाठी काहीही करायला तयार आहे. त्यामुळेच तर त्याने राजविंदरसाठी भूवनेश्वरमध्ये होणार्‍या सीनिअर नॅशनल चॅम्पियनशीपचा त्याग केला होता. कारण या खेळांमध्ये राजविंदरला भाग घ्यायचा होता, त्यामुळे लहान मुलाच्या देखरेखीसाठी कुलविंदर स्वतः घरी राहिला व राजविंदरला त्याने खेळास पाठवले. या खेळामध्ये राजविंदरनेही पतीच्या बलिदानाला व्यर्थ जाऊ न देता रजत पदक पटकावले. भुवनेश्वरमधील अनुभव राजविंदरला ग्लासगो येथील राष्ट्रकूल खेळांमध्ये कामाला आला. राष्ट्रकुल खेळामध्ये राजविंदरने कांस्यपदक पटकावले. याबद्दल बोलताना कुलविंदर म्हणाला, "माझे स्वप्न सत्यात उतरले."

पटियालामध्ये पहिल्यांदा भेटलो
इथपर्यंतच्या नात्याबद्दल बोलताना कुलविंदर म्हणाला, आम्ही दोघे पहिल्यांदा पटियालाच्या सेंटर फॉर एक्सिलेंस येथे भेटलो. मी तीन तेथे तिन वर्षांपासून सराव करत होतो, तर 2003 ला राजविंदर तेथे आली. या पुर्वी मी दोह्यात आशियायी खेळामध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते. 2004 मध्ये आम्ही एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतो असे आम्हाला वाटले. त्यानंतर 2006 ला एक अप्रिय घटना घडली. माझी बहिण एका अपघातात जळाली. तिच्यावर अमृतसर येथे उपचार सुरू होते. त्यावेळी राजविंदर सराव सोडून माझ्या बहिणीची देखभाल करायला लागली. या गोष्टीने मला एवढे प्रभावित केले की, त्यानंतर मी तिला प्रपोज केले. राजविंदरनेही लगेच होकार दिला आणि आमच्या घरातील सदस्यही तयार झाले. 2006 मध्ये आमचा साखरपुडा झाला. मात्र खेळांसाठी आम्ही दोन वर्षांनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

कुलविंदर आणि राजविंदर यांचे लग्न 2008 मध्ये झाले. त्यानंतर मार्च 2012 ला त्यांना पुत्ररत्नप्राप्ती झाली. याच वर्षी ऑक्‍टोबरमध्ये पोलिस खेळांमध्ये या दोघांनाही सहभाग घ्यायचा होता. मात्र त्यावेळी त्यांचा मुलगा केवळ 7 महिन्यांचा होता. त्यामुळे त्याला अशा परिस्थितीत सोडून राजविंदर खेळायला जाण्यास तयार नव्हती. मात्र कुलविंदरने तिला प्रोत्साहन दिले. या दोघांचे सामने दिल्लीमध्ये होते. जेव्हा कुलविंदर खेळून आले त्यानंतर राजविंदर खेळण्यास गेली आणि कुलविंदरने मुलास सांभाळले. या खेळांमध्ये राजविंदरने रजतपदक मिळवले. त्यानंतर डिसेंबरमध्ये राजविंदरला भुवनेश्वरला जावे लागले, त्यावेळी राजविंदरने पुढे जायला हवे असे कुलविंदर म्हणाला.

राजविंदरने सीओ नागे पध्दतीचा वापर करत जिंकला सामना
पीएपीच्या अहवालानुसार राजविंदर कौरने ग्लासगोमध्ये केनियाच्या एस्थर एकिन्यी रातुगीला सीओ नागे (शोल्डर थ्रो) मारत हरवले. या पध्दतीमध्ये प्रतिस्पर्धीला वाचण्याची कोणतीही संधी मिळत नाही. या पध्दतीत प्रतिस्पर्ध्याला खांद्यावरून ओढत पुढे पाडले जाते. ही पध्दती राजविंदरला तिचे मार्गदर्शक देवेंद्र यादव यांनी शिकवली होती. याबद्दल बोलताना देवेंद्र यादव म्हणाले की, राजविंदरची आवडती पध्दती हराये नागे आहे. यामध्ये खांदा आणि हातांवर नियंत्रण मिळवत एका पायावरचे संतुलन बिघडवून प्रतिस्पर्ध्याला समोर फेकले जाते.

पुढील स्लाईडवर पाहा.... राजविंदर आणि कुलविंदरच्या कुटुंबाचे काही फोटो...