आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेडल मिळवण्‍याच्‍या नादात या भारतीयाला नाही राहिले तिरंग्‍याचे भान !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- लंडनमध्‍ये सुरू असलेल्‍या ऑलिम्पिक खेळात भारतीय अव्‍वल नेमबाज रंजन सोढीवर तिरंग्‍याचा अपमान केल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे.
जागतिक क्रमवारीत नंबर एकवर असलेला खेळाडू रंजन सोढीने दोन ऑगस्‍ट रोजी झालेल्‍या सामन्‍यात आपल्‍या कानावर लावलेल्‍या इअर मफ्फसवर भारताचा गोलाकार आकारातील झेंडा लावला होता, असा आरोप ज्‍येष्‍ठ समाजसेवक ज्ञानप्रकाश कामरा यांनी केला आहे. तिरंगा सन्‍मान कायदा 1971 नुसार आयताकार आकारात असला पाहिजे. त्‍याला विकृत आकारात वापरता येणार नाही.
कामरा यांनी यासंबंधी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पत्र लिहून राष्‍ट्रीय ध्‍वजाचा सन्‍मान करण्‍यात यावी अशी मागणी केली आहे. त्‍यांनी स्‍थानिक पोलिसांनाही याविषयी माहिती दिली आहे.
OLYMPIC: सेंट्रल लंडन नव्हे, हे तर भुतांचे शहर!
MYSTERY : 'त्‍या' अनोळखी महिलेने मागितली माफी
TERRIFIC: जुआन मार्टिनने फेडररला दिली विक्रमी झुंज