आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेहवाग बीसीसीआयच्या ग्रेडिंग लिस्टमधून आऊट, अमेरिकी माध्यमांनी सचिनला बसवले गांधीजींच्या पंक्तित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनच्या निरोपाचा 200 वा कसोटी सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. तर, दुसरीकडे वीरेंद्र सेहवागसाठी वाईट बातमी आहे. बीसीसीआयने ग्रेडिंग लिस्टमधून सेहवागला आऊट केले आहे. आता त्याला कराराची रक्कमही मिळणार नाही. बोर्डच्या या निर्णयाने सेहवाग आता पुन्हा संघात परतणार नसल्याचेच मानले जात आहे.
मुंबईत सचिन आज करिअरमधील शेवटची कसोटी खेळत आहे. हा सामना सर्वोत्तम व्हावा यासाठी बीसीसीआयने अनेक उपाय योजले आहेत. भारतातील माध्यमांनी सचिनचे भरभरून कौतूक केले आहेच त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही त्याच्या स्तुतीत कंजूषी केलेली नाही.
अमेरिकेत भारताएवढे क्रिकेटचे वेड नाही, तरीही सचिनच्या निवृत्तीच्या बातम्या आणि चर्चाही तेथील माध्यमांमध्ये जोरदार सुरू आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने तर सचिनच्या क्रिकेट निवृत्तीची तुलना महात्मा गांधीच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीशी केली आहे.