आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saina Nehwal Loses 13 21 13 21 To World Number One Yang Wihan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC : 'चीनी भिंत' अभेद्यच, सायना नेहवालचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भारताची 'फुल'राणी सायना नेहवाल लंडन ऑलिंपिकच्या सिंगल्स बॅंडमिंटनच्या उपांत्य फेरीत जागतिक पातळीवरील क्रमांक एकची चीनची खेळाडू यिहान वांग हिच्याकडून पराभूत झाली. वांगने सायनाला २१-१३ व २१-१३ अशा सरळ सेटमध्ये सहज हरविले. चीनच्या वांगने संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखले. सुरुवातीला सायनाने पहिल्याच झटक्यात आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर वांगने स्मॅशचे फटके मारत सायनाला फॅकबूटवर ढकलले ते सामना संपेपर्यंत.
सायनाने पहिला सेट १३-२१ ने गमविल्यानंतर दुस-या सेटमध्ये तिने वांगला झुंजवले. दुस-या सेटमध्ये १२-१२ अशी बरोबरी होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात सायनाला ती लय राखता आली नाही. वांगच्या सर्विसपुढे सायना वारंवार चुका करीत होती. त्यामुळे वांगला एक-एक गुण बहाल होत होता. दुसरीकडे, सायनाचा गुणफलक मात्र तसाच होता. अखेर वांगने दुसरा सेटही २१-१३ असा सहज जिंकत सामना खिशात घातला. याचबरोबर चीनने आपल्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक निश्चित केले. दरम्यान, सायनाचा पराभव झाल्याने भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. तरीही सायना दुस-या सेमीफायनला लाईनअप ( झीन वांग वि. झिरुई ली, दोघीही चीन) मधील पराभूत खेळाडूबरोबर ब्रांझपदकासाठी लढत देईल.

PHOTOS: जाणून घ्‍या 'फुल'राणीच्‍या काही खास गोष्‍टी
OLYMPIC : पेस-सानिया मिर्झा जोडी उपांत्यपूर्व फेरीत,
OLYMPIC प्रगतिपुस्तक : भारताला आतापर्यंत एकच कांस्य