आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना, पी. व्ही. सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वुहान (चीन) - बॅडमिंटनएशिया चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या स्टार शटलर सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूने एकेरीच्या प्रारंभिक लढती जिंकून दुसरी फेरी गाठली आहे.
पाचव्या सिडेड सायनाने इंडोनेशियाच्या फित्रियानीचा २१-१६, २१-१७ ने, तर सिंधूने इंडोनेशियाच्या मारिया फेबे कुसुमस्तुतीचा २१-१०, २१-१३ ने पाडाव केला.
दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायनाला लिंडावेनी फानेत्री (इंडोनेशिया)-नितचोन जिंदापोल (थायलंड) यांच्यातील विजयी खेळाडूविरुद्ध, तर युवा खेळाडू पी.व्ही. सिंधूला आठव्या सिडेड चायनीज तायपेईच्या ताई त्झू यिंगविरुद्ध झुंजायचे आहे.
तिकडे महिला दुहेरीत कोरियन जोडी चँग ये ना-ली सो ही यांनी भारतीय जोडी ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पाला २१-१५, २१-११ ने, तर पुरुष दुहेरीत भारतीय जोडी मनू अत्री-बी सुमिथ रेड्डी यांना पाचव्या सिडेड जपानी जोडी हिरोयुकी एनडो-केनिची हायाकावा १५-२१, १३-२१ ने नमवले.