आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LONDON OLYMPIC : नेमबाजीत अजून एका पदकाची आशा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगाधरी - तो ऑलिम्पिक पदक जिंकेल अशी मोठी आशा आम्हाला आहे. या वेळेस नशिबानेही संजीवला थोडीशी साथ द्यावी यासाठी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहोत. केव्हा तो पदकाचा वेध घेऊन हरयाणा राज्य व देशाचे नाव जगभरात मोठे करतो, अशी आस भारतीय नेमबाज संजीव राजपूतची आई उषा रानी यांना लागली आहे.
‘यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची अपेक्षा संजीवकडून आहे. कोणत्याही परिस्थितीत या वेळेस पदक जिंकून आणावे, यासाठी सतत देवाकडे प्रार्थना करत आहे,’ असेही उषा रानी म्हणाल्या.
2004 मध्ये पाकिस्तानात झालेल्या सॅफ स्पर्धेत संजीवने तीन सुवर्ण व एक रौप्यपदकाचा वेध घेतला होता. 1999 मध्ये नौदलात तो दाखल झाला होता. तो पुन्हा नेमबाजीकडे 2001 मध्ये वळला. त्यानंतर त्याने यामध्ये सातत्य टिकवून ठेवले. यामुळे त्याची नेमबाजीतील कामगिरी उल्लेखनीय ठरली.
‘ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचे वेड त्याला लागलेले आहे. त्यासाठीची तयारी त्याने दोन वर्षांपासून सुरू केली आहे. तो जीव तोडून कष्ट करत आहे. यामागे केवळ एकच लक्ष्य आहे ते म्हणजे ऑलिम्पिक पदकाचा वेध,’ असे संजीवचे वडील कृष्ण लाल यांनी सांगितले.
झोपण्याचाही विसर पडायचा - सलग 13 तास सराव करत असलेल्या संजीवला झोपण्याचीदेखील आठवण राहत नव्हती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. प्रचंड कष्ट करूनही त्याचे मन भरत नाही. त्यानंतर मिळवलेल्या यशाचा त्याचा आनंद गगनात मावत नाही. त्याचा प्रत्यय 2004 मध्ये आला होता, असेही कृष्ण लाल यांनी सांगितले. सोमवरच्या त्याच्या कामगिरीकडे आमचे डोळे लागले असल्याचे त्यांनी नमूद केले.
नेमबाजीतील बदल स्वागतार्ह : जसपाल राणा - दोहात झालेल्या 2006 च्या आशियाई स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदके घेऊन आपले श्रेष्ठत्व सिद्ध केलेल्या जसपाल राणाने भारतीय नेमबाजांची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. तसेच देशाचे क्रीडा मंत्री, शूटिंग फेडरेशन आणि लष्करदेखील खेळाडूंनी योग्य सुविधा पुरवत असल्यानेच भारताला हे यश प्राप्त झाले असून हा अत्यंत चांगला बदल असल्याचे जसपाल राणा यांनी सांगितले. आपल्या देशातील नेमबाजांना यापेक्षा अधिक काहीच नको असते. नेमबाजीतील केवळ दोनच प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा भारताने सर्वच प्रकारांमध्ये प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे राणा याने सांगितले. अधिकाधिक नेमबाजांना संधी मिळाल्यास भारताला त्यातून अनेक पदके मिळवणे शक्य आहे. त्यामुळे पदकांसाठी केवळ एक-दोन खेळाडूंवर अवलंबून राहण्याची वेळदेखील आपल्यावर येणार नाही.