आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Serena & Venus Williams Win Third Olympics Tennis Doubles Gold ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : व्हीनस-सेरेनाला सुवर्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने रविवारी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा डबल धमाका केला. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात तिने व्हीनससोबत चेक गणराज्यच्या आंद्रिया हलवाकोवा व लुुशिया हार्डेका या जोडीला 6-4, 6-4ने अशा फरकाने धूळ चारली. सेरेना-व्हीनसने अवघ्या 1 तास 33 मिनिटांत सुवर्णपदक आपल्या नावे केले. या जोडीचे हे तिसरे ऑलिम्पिक पदक, तर सेरेनाचे लंडन ऑलिम्पिकमधील दुसरे सुवर्ण आहे.
महिला एकेरीत मिळालेल्या सुवर्णपदकाचा उत्साह कायम ठेवत सेरेनाने अंतिम सामन्यात व्हीनससोबत दमदार खेळीचे प्रदर्शन केले. व्हीनस बहिणींनी ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत वैयक्तिक आणि दुहेरीत एकूण पाच सुवर्णपदके जिंकली आहेत.