आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shelly ann Defends Crown, Opens Jamaica's Run Account‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : शेली ठरली वेगवान महिला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जमैकाची शेली एन फ्रेजर प्राइसने 100 मीटर धावण्यात सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. या विजयामुळे ती पुन्हा एकदा ऑलिम्पिकमधील वेगवान महिला ठरली आहे. जमैकाच्या या अ‍ॅथलिटने महिला गटात 100 मी. शर्यतीत 10.75 सेकंदाची वेळ घेत पहिला क्रमांक मिळवला. अमेरिकेच्या कार्मेलिटा जेटरने 10.78 सेकंद वेळेसह रौप्यपदक तर जमैकाच्याच ब्राऊन वेरोनिका कैपबेलने (10.81) कांस्यपदकावर आपले नाव कोरले. शैलीने तिची सर्वोत्तम वेळ दिली असली तरी 1988 साली फ्लोरेन्स जोयनरने केलेल्या 10.62 सेकंदाचा विश्वविक्रम अबाधित राहिला आहे.