आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- अखेरच्या पन्नास मीटरच्या टप्प्यात चीनच्या यी शिवेनने गाठलेला अद्भुत वेग हा अद्यापही चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे. अमेरिकेच्या रेयान लोशेपेक्षाही तिने तब्बल 23 सेकंदांचा वेळ कमी घेतला असून या क्षेत्रातील तज्ज्ञ जलतरणपटूंनादेखील हे एक अनोख्या आश्चर्यासमान वाटत असल्याने ती जणू एक जिवंत दंतकथा बनली आहे.
शिवेनने तिच्या करिअरचा प्रारंभ 2010 मध्ये चीनमधील ग्वांगझाऊ येथे झालेल्या आशियाई स्पर्धेपासून केला. त्यावेळीच तिने स्वत:मधील प्रतिभेची चुणूक दाखवून दिली होती. 200 आणि 400 मीटर स्पर्धेत तिने मिळवलेले विजेतेपद ही ऑलिम्पिकमधील विजयाची नांदीच होती. तरीदेखील अमेरिकन जलतरण पथकाची प्रमुख असलेल्या टेरी मेकेव्हर यांनी शिवेनच्या वेगाबाबत लोकांमध्ये साशंकता असल्याचे नमूद केले. लोकांनी जी गोष्ट बघितलेली नसते ती घडू शकते यावर त्यांचा चटकन विश्वासच बसत नाही. तिने यापूर्वी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेली आम्ही बघितले असले तरी या लढतीमधील तिचा वेग हा अविश्वसनीयच होता, असेही टेरी हिने सांगितले.
सर्वश्रेष्ठ ऑलिम्पिकवीर मायकल फेल्प्सचे गुरू असलेल्या बॉब बॉमन यांनी मात्र शिवेनची पाठराखण करीत असे अतुलनीय परफॉर्मन्सेस घडू शकतात असे म्हटले आहे. स्वत:ची उंची, शरीराचा आकार आणि लांब हातांचा तिला उपयोग झाला असावा, असेही त्यांनी नमूद केले.
फेल्प्सच्या प्रशिक्षकांचे शब्द दिलासादायक
फेल्प्सच्या प्रशिक्षकांकडून मिळालेला पाठिंबा हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे शिवेनचे म्हणणे आहे. फेल्प्स हा माझा आदर्श असल्याने निदान त्याच्या प्रशिक्षकांचे बोल मला दिलासा देणारे असल्याचे तिने नमूद केले. फेल्प्सइतकीच पदके जिंकण्याचा माझा मानस आहे. अर्थात ते शक्य होईल की नाही याबाबत मी विचार करणार नाही. मी केवळ त्यासाठी प्रयत्न करू शकते, असेही शिवेनने सांगितले.
200 मीटरमध्ये विक्रमासह सुवर्ण
जलतरणातील 400 मीटरच्या अंतिम लॅपमध्ये पुरुषांपेक्षाही कमी वेळ देणार्या शिवेनने गुरुवारी 200 मीटर मेडलेमध्ये देखील सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेतही विजय मिळवल्यानंतर शिवेनच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे करणार्यांनी माफी मागावी, अशी मागणी तिच्या प्रशिक्षकांनी केली आहे.
भूपतीचे हताश उद्गारः शेवटची ऑलिम्पिक खेळलो, गुडबाय!
PHOTOS: ऑलिम्पिक खेळाडूंचे अनोखे टॅटू...पाहातच राहाल!
ऑलिम्पिक आणि वाद
एकाग्रते, तुझे नाव ऑलिम्पिक पदक
ऑलिम्पिक डायरीः प्रेक्षक गेले कुठे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.