आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC मसाला: लंडनमध्‍येही पसरलाय अंधश्रद्धेचा वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळाडूंमध्‍ये वेगवेगळया प्रकारच्‍या अंधश्रद्धा असल्‍याच्‍या बातम्‍या कायम आपल्‍या वाचनात येत असतात. जसं क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ क्रिकेट खेळताना खिशात लाल रूमाल ठेवत किंवा सचिन तेंडुलकर डाव्‍या पायाचे पॅड पहिल्‍यांदा घालतो, अशा वेगवेगळया खेळाडूंचे किस्‍से तुम्‍हाला माहित असतील.
लंडन ऑलिम्पिकमध्‍येही अशाच एका खेळाडूच्‍या अंधश्रद्धेबाबत सध्‍या मोठया प्रमाणात चर्चा सुरू आहे. अमेरिकेचा जिम्‍नॅस्‍ट डेनेल लेवाच्‍या टॉवेलला आता सगळेजण ओळखतात.
सामन्‍यादरम्‍यान तो हा टॉवेल आपल्‍या डोक्‍यावर टाकून चेहरा पूर्णपणे झाकून घेतो. पूर्वी त्‍याच्‍याकडे फिकट निळ्या रंगाचा चांदण्‍या असलेले दोन टॉवेल होते. आता त्‍याच्‍याकडे एकच आहे. दुसरा टॉवेल फाटला आहे.
यावर्षी हिवाळी स्‍पर्धेत लेवा त्‍याचा लकी टॉवेल नेण्‍यास विसरला. नेमका त्‍याच स्‍पर्धेत त्‍याची कामगिरी सुमार दर्जाची झाली होती. त्‍यामुळे टॉवेलमध्‍ये किती ताकद आहे, याची तुम्‍हाला कल्‍पना येऊ शकेल. त्‍याचा टॉवेल आता इतका प्रसिद्ध झाला आहे की, याचे ट्विटर अकॉंउटसुद्धा तयार करण्‍यात आले आहे.
PHOTOS: ऑलिम्पिक 2012 मधील आतापर्यंतचे गोल्‍ड मेडलिस्‍ट
FIXING : बॅडमिंटन पाठोपाठ बॉक्सिंगमध्‍येही फिक्सिंग ?
लंडन आय: \'बॅड\'मिंटन!
PHOTOS: लंडन ऑलिम्पिकमधील काही हटके आणि आकर्षक नजारे...
कॅमेराने टिपलेले लंडन ऑलिम्पिकचे रंगारंग दृश्‍य
OLYMPIC: अजब... सात समुद्र पार करुन दोन वर्षांनी गाठले लंडन
लंडन आयः महिलांच्या कर्तृत्व व जिद्दीला सलामी!