आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tendulkar Writes, Greg Chappell Was Dictatorial As Team India Coach

'प्लेइंग इट माय वे' चॅपेल गुरुजी करायचे दादागिरी, सचिनने घेतला समाचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : ग्रेग चॅपल आणि सचिन तेंडुलकर

नवी दिल्ली - सचिन तेंडुलकरचे जीवनचरित्र सहा नोव्हेंबरला प्रकाशित होत आहे. त्यापूर्वीच पुस्तकातून काही महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत. सचिनने त्याचे आत्मचरित्र असलेल्या 'प्लेइंग इट माय वे' मध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपलवर टीका केली आहे.

2007 च्या विश्वचषकापूर्वी राहुल द्रविडला हटवून सचिन तेंडुलकरला कर्णधार बनवण्याची ग्रेग चॅपल यांची इच्छा होती, असे सचिनने आपल्या पुस्तकात म्हटले आहे. क्रिकेटचा देव अशी उपमा मिळालेल्या सचिनने चॅपल यांचा उल्लेख करत म्हटले आहे की, ग्रेग चॅपल संघावर आपले विचार थोपवत होते. सगळ्या खेळाडुंनी ते सांगतील तेच ऐकावे असे त्यांना
वाटायचे. त्यांचे निर्णय चुकीचे असले, तरी त्यांची अशीच अपेक्षा असायची. चॅपेल यांची दादागिरी कोणत्याही खेळाडुला आवडत नव्हती त्यामुळे खेळाडुंमध्ये वाद वाढले होते, असेही सचिनने लिहिले आहे.
फलंदाजी क्रमही बदलणार होते ?
सचिनने या पुस्तकात लिहिले आहे की, 2007 चा विश्वचषक सुरू होण्यापूर्वी चॅपल यांना टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्याची इच्छा होती. राहुल द्रविडकडून कर्णधारपद मला द्यावे अशी त्यांची इच्छा होती. पण मी स्वतः कर्णधारपद सोडले होते. ग्रेगला माझ्या फलंदाजीचा क्रमही बदलायचा होता. पण माझी त्यासाठी तयारी नव्हती. त्यांचे म्हणणे होते की, मी मधल्या फळीत खेळलो तर संघाला अधिक फायदा होऊ शकतो. पण त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चूक ठरला होता.
वाढला होता वाद
चॅपल यांच्या हस्तक्षेपानंतर टीम इंडियामध्ये चांगलाच वाद वाढला होता. सौरव गांगुली त्यांच्या निशाण्यावर होते. गांगुलीने चॅपल यांना प्रशिक्षकपदासाठी पाठिंबा दिला होता. पण वाद वाढल्यानंतर सचिन आणि गांगुलीच त्यांना हटवण्यास कारणीभूत ठरले.