आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LONDON OLYMPIC : बोल्ट पृथ्वीवरचा वेगवान मानव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ‘स्टार्ट’ असा स्टार्टरचा आवाज लंडन ऑलिम्पिक स्टेडियममध्ये घुमला आणि आवाजाचा प्रचंड कल्लोळ करणारी 80 हजार तोंडे बंद झाली. टाचणी पडली तरी आवाज येईल, एवढी शांतता पसरली. येत्या चार वर्षांतला वेगवान मानव शंभर मीटर्सच्या त्या धावपट्टीवर निश्चित होणार होता. त्या किताबासाठीचे दावेदार या वेळी अनेक होते. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या शर्यतीकडे लागले होते. त्या प्रश्नाचे उत्तर अवघ्या 9.63 सेकंदांत मिळाले. जमैकाच्या युसैन बोल्टनेच आणखी चार वर्षांसाठी जगातील सर्वात वेगवान मानव आपणच आहोत हे सिद्ध केले.
स्टार्ट प्रथमच चांगला झाला. नेहमी बोल्ट स्टार्टवरच अडखळतो. गतवर्षी तर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत स्टार्टरने बोल्टला शर्यतीबाहेर काढले होते. या वेळी तसे काही घडले नाही. त्यामुळे बोल्ट पहिल्या मीटर्सपासून सुसाट सुटला. बीजिंगमध्ये अन्य स्पर्धक किती मागे आहेत हे पाहण्यासाठी त्याने मान वळवली होती. रविवारी ब्लॅक, गॅटलिन, टायसन गे, पॉवेल यांनी त्याला संधीच दिली नाही. त्यामुळे बीजिंग ऑलिम्पिक जे हुकले होते ते बोल्टला लंडनमध्ये गवसले. बीजिंगची ऑलिम्पिक उच्चांकाची वेळ त्याने आज लंडनमध्ये आणली 0.06 सेकंदांनी कमी केली.
असाफा पॉवेलच्या पायात गोळे आले. उपान्त्य फेरीत सर्वात वेगवान वेळ देणारा जस्टिन गॅटलिन वेगात धावत होता. 50 मीटर्स अंतरापर्यंत त्यानेच मुसंडी मारली. दुस-या कोप-यात सातव्या लेनमध्ये असलेला बोल्ट मग वा-याच्या वेगाने पुढे सरकला. त्याचा सरावाचा साथीदार योहान ब्लेक त्याची पाठ पकडून होता. दोघांनी कधी मागे टाकले ते गॅटलिनला कळले नाही. पहिल्या मीटर्सच्या धावेपासून सुरू झालेले प्रेक्षकांच्या आवाजाचे चित्कार शर्यत संपली तेव्हा पताकास्थानापर्यंत पोहोचले होते. बोल्ट... बोल्ट... आणि बोल्ट... असा प्रत्येक मुखातून आवाज आला. लंडन ऑलिम्पिक इतकीच प्रसिद्धी मिळालेली शंभर मीटर्सची शर्यत संपली होती.
प्रत्येक क्षेत्रात बोल्ट नंबर-1
* चार वर्षांत युसैन बोल्टने 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती जमवली आहे.
* निवांत क्षणी मासे पकडण्याचा छंद आहे. आता याला व्यवसायाचा रूप देण्याच्या विचारात.
* लंडन ऑलिम्पिकनंतर अनेक नव्या प्रायोजकांसह कराराची शक्यता. यामुळे तो व्यवसायाच्या नव्या योजना तयार करू शकेल.
* जमैकाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी टुरिझम अ‍ॅम्बेसेडरच्या रूपाने
*जगभरातील पर्यटकांना आपल्या देशाकडे खेचण्यासाठी तो पर्यटनाला चालना देईल.