आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योहान ब्लॅकने ‘वेक अप कॉल’ दिला होता : बोल्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - एकविसाव्या शतकात पृथ्वीवरच्या वेगवान मानवाला सलग दोन ऑलिम्पिकमध्ये हा किताब मिळवल्यानंतर गाठणे प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना कठीण गेले. तब्बल काही तासांची प्रतीक्षा केल्यानंतर अखेर युसैन बोल्टचे दर्शन घडले.
तोंडाने विचित्र आवाज काढत, मस्करी करतच तो पत्रकारांना सामोरा गेला. म्हणाला, एक से बढकर एक अशा दिग्गजांच्या सोबत धावून मी चॅम्पियन झालो. मला जगाला दाखवून द्यायचे होते, की मीच महान (ग्रेटेस्ट) आहे. दोन महिन्यांपूर्वी योहान ब्लॅकने मला ‘वेक अप कॉल’ दिला म्हणूनच आज जिंकू शकलो. माझा स्टार्ट नेहमी खराब असतो. त्यामुळे या वेळी माझ्या प्रशिक्षकांनी त्यावर अधिक मेहनत घेतली होती. स्टार्टवरच आम्ही अधिक फोकस केले होते. त्यामुळे येथे एकच ‘लक्ष्य’ नजरेसमोर ठेवून आलो होतो, ते म्हणजे चांगला ‘स्टार्ट’ करण्याचे.
बोल्ट पुढे म्हणाला की, माझ्या कोचचे अभिनंदन करायला हवे. त्याने लंडनला दोन दोन वेगवान मानव दिले. मी पहिला आलो तर योहान ब्लॅक दुसरा. विजय सेलिब्रेट कसा करणार? या प्रश्नावर तो म्हणाला, जमैकाच्या माझ्या देशवासीयांना विजयाचा आनंद लुटू दे. मला, माझ्या देशाला अशा यशाची, प्रोत्साहनाची गरज आहे. मी आनंद साजरा करणार नाही. जमैकन लोकांनी आनंद लुटला की मला त्याचे अधिक समाधान मिळेल.
अंतिम फेरीबाबत त्याने सांगितले, शर्यत अतिशय वेगवान होती. गत विश्व अजिंक्यपद स्पर्धेपेक्षाही वेगवान होती. ब्रिटनची कामगिरी चांगली आहे. त्यांचेही सामने मी पाहतो. मी लंडन ऑलिम्पिकमधील टेनिस आवडीने पाहिले. रोर्इंग, सायकलिंग, स्विमिंग हे खेळ पाहिले. जलतरणातील फेल्प्सच्या शर्यती पाहिल्या. फेल्प्स ‘ग्रेट मॅन’ आहे. त्याने सुवर्णपदके किती तरी जिंकली आहेत. 4 बाय 400 मीटर्स शर्यत धावणार का, असे विचारल्यावर तो म्हणाला, देशाला गरज वाटली तर निश्चितच त्या शर्यतीतही धावेन.