आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vijay became the first indian to brought the silver for countr

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्‍या देशाला रौप्‍य पदक मिळवून देणा-या विजयकुमार विषयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिकमध्‍ये गगन नारंगने कांस्‍य पदक मिळवून देवून देशाची मान उंचावली होती. तर आज विजय कुमारने 25 मीटर रॅपिड फायर पिस्‍तुल स्‍पर्धेत रौप्‍य पदक मिळवून इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारा विजय पहिलाच भारतीय ठरला आहे.
25 मीटर रॅपिड फायर पिस्‍तुल स्‍पर्धेत विजयकुमारने शानदार प्रदर्शन करत भारताला पहिले रौप्‍य पदक मिळवून दिले आहे. अत्‍यंत चुरशीने झालेल्‍या या सामन्‍यात फक्‍त चार गुणांनी त्‍याचे सुवर्ण पदक हुकले. जागतिक विक्रमाची बरोबरी करीत क्‍युबाच्‍या लॉरिस पूपोने सुवर्ण पदक मिळवले. पूपोने 34 आणि विजयकुमारने 30 अंक मिळवले. चीनचा डिंग फेंगने 27 गुण मिळवून कांस्‍य पदक प्राप्‍त केले.
जाणून घेऊया विजय कुमारशी निगडीत काही खास गोष्‍टी...