आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन - लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणा-या विजयकुमार याला लष्करात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. लष्करप्रमुख विक्रमसिंह यांनी वैयक्तिक स्तरावर या प्रकरणात लक्ष घातले असल्याने लवकरच बढती दिली जाण्याची चिन्हे आहेत. अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पदके जिंकल्यानंतरही पदोन्नती मिळाली नसल्याबाबत विजयकुमारने नाराजी व्यक्त केली करीत नोकरी सोडण्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणात थेट लष्करप्रमुखांनीच लक्ष घातल्याने विजयकुमारला पदोन्नतीबाबत न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.