आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Williams And Bryan Brothers Win, Earning Golden Slam ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘गोल्डन’ स्लॅम; फायनलमध्ये सेरेनाने शारापोवाला हरवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने शनिवारी मारिया शारापोवावर मात करून लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले. तिचे हे करिअरमधील तिसरे ऑलिम्पिक सुवर्ण ठरले. शारापोवाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. बेलारुसची अझारेंका कांस्यची मानकरी ठरली. सेरेनाने यापूर्वी बीजिंग व सिडनी ऑलिम्पिकच्या महिला दुहेरीत सुवर्ण मिळवलेले आहे.
करिअर गोल्डन स्लॅम : सेरेनाने ‘करिअर गोल्डन स्लॅम’मय केले. यामध्ये 4 ग्रॅण्डस्लॅमसह ऑलिम्पिक सुवर्णचा समावेश आहे. अशी कामगिरी करणारी ती चौथी महिला टेनिसपटू ठरली.
ब्रायन बंधूंना सुवर्ण - अमेरिकेच्या ब्रायन बंधूंनी ऑलिम्पिक टेनिसच्या पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात माइक व बॉब ब्रायनने फ्रान्सच्या विल्फेड त्सोगा व मायकल लोड्राला 6-4, 7-6 अशा फरकाने धूळ चारली.
सानिया-पेस स्पर्धेबाहेर - सानिया मिर्झा व लिएंडर पेस जोडी शनिवारी ऑलिम्पिकमधून बाहेर पडली. मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सानिया-पेसला बेलारूसच्या अव्वल मानांकित मॅक्स मिर्नामी व व्हिक्टोरिया अझारेंकाने 7-5, 7-6 अशा फरकाने पराभूत केले. पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात आले.