आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Women's Singles Semifinals Saina Nehwal Vs Yihan Wang

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC LIVE : सायनाच्या पदकापुढे 'चीनी भिंत'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- सायना नेहवालने गुरुवारी बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. महिलांच्या उपांत्यपूर्व लढतीत सायनाने डेन्मार्कच्या टीन बून हिला 21-15, 22-20 ने नमवत बाजी मारली. दुसर्‍या गेममध्ये सायनाने 13-10 अशी आघाडी घेतली. मात्र, टीनने 15-15 अशी बरोबरी केली. दोन्ही खेळाडू एकेक गुण घेत होते. अखेर 20-20 अशी बरोबरी झाली. यानंतर सायनाने सलग दोन गुण मिळवत 22-20 ने सामना जिंकला. चौथी मानांकित सायनाने अत्यंत आक्रमक खेळ करताना डेन्मार्कच्या खेळाडूचे आव्हान अवघ्या 39 मिनिटांत मोडून काढले.
PHOTOS: जाणून घ्‍या 'फुल'राणीच्‍या काही खास गोष्‍टी
OLYMPIC : पेस-सानिया विजयी, विजयानंतर रडला पेस
OLYMPIC दृष्‍टीक्षेपः फेडरर, सेरेना, शारापोवा उपांत्य फेरीत
OLYMPIC प्रगतिपुस्तक : भारताला आतापर्यंत एकच कांस्य