आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यथित यांगचा बॅडमिंटनला अलविदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- लंडन ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत जाणूनबुजून गुण आणि सामना गमावल्याच्या आरोपांनी व्यथित होऊन चीनच्या यू यांगने खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे. जागतिब बॅडमिंटन संघटनेचा अपात्र ठरवण्याचा निर्णय आपल्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा असल्याचे यांगने म्हटले आहे.
मॅच फिक्सिंगप्रकरणील आठ खेळाडूंना बुधवारी जागतिक बॅडमिंटन संघटनेने अपात्र घोषित केले होते. यात यांग आणि तिच्याच देशाच्या वांग जिओली ही जागतिक चॅम्पियन जोडीचाही समावेश होता. ट्विटरच्या धर्तीवरील चिनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट टेसेंट आणि वेईबोवर यांगने सांगितले की, ही ऑलिम्पिकमधील माझ्यासाठी शेवटची संधी होती. जागतिक बॅडमिंटन संघटनेला अलविदा. माझ्या आवडत्या बॅडमिंटनला कायमचा गुडबाय. आम्ही केवळ नियमांचेच पालन केले.
चीनचे मुख्य बॅडमिंटन प्रशिक्षक ली योंगबो यांनी फिक्सिंग प्रकरणात माफी मागत सांगितले की, आमच्या खेळाडूंनी ‘फायटिंग स्पिरिट’चे प्रदर्शन केले नाही. दुसरीकडे, चीनने आपल्या ऑलिम्पिक पथकाद्वारे प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या प्रमुखांनीही या प्रकरणाबाबत खेद व्यक्त करत बॅडमिंटन रसिकांची माफी मागितली आहे.

खेळाडूंनी माफी मागावी
चिनी वृत्तसंस्था शिहुन्हानुसार, चिनी अधिकारी खेळाडूंना जाहीरपणे देशाची माफी मागण्याचा आग्रह करत आहेत. प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या शिष्टमंडळाने आधीच या प्रकाराबाबत खेद आणि टीका केली आहे. जबाबदार बॅडमिंटन अधिकारी, संघ आणि संबंधित खेळाडूंनी या प्रकरणातील गांभीर्य आणि संभाव्य नामुष्कीला समजून घ्यावे. मोकळ्या मनाने या प्रकाराबाबत त्यांनी माफी मागावी, तसेच पुन्हा असे कधी होणार नाही याचे वचनही द्यावे.