आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडन डायरी : बोल्ट मॅकडोनाल्डमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण जगाच्या नजरा सध्या युसेन बोल्टवर लागल्या आहेत. शुक्रवारपासून सुरू झालेल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत बोल्टची शर्यत कधी आहे हा एकच प्रश्न प्रत्येक जण विचारत होता. बोल्टच्या प्रतीक्षेत असलेल्यांना कालपरवा मॅकडोनाल्डमध्ये धक्काच बसला. ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये मॅकडोनाल्डचे मोठे केंद्र आहे. रांगेत युसेन बोल्टला पाहून सेल्सगर्ल गांगरलीच. आधी तिचा विश्वासच बसेना. बोल्टने तिला ऑर्डर दिली तेव्हा ती भानावर आली. बोल्टची ऑर्डरदेखील वेगळीच होती. त्याने चिकन नगेट्चे 20 पिसेस मागितले. मॅकडोनाल्ड एका बॉक्समध्ये 6 चिकन नगेट देते. बोल्टची मागणी पूर्ण करण्यासाठी त्या सेल्सगर्लला 6 च्या प्रमाणात चिकन नगेट्सचे तुकडे भरावे लागले. अ‍ॅथलेटिक्स व्हिलेजमध्ये बेस्ट ऑफ युरोप, आशिया खंडाचा स्वाद, कॉन्टिनेंटल विभाग आणि चिनी डिशेश असे वेगवेगळे विभाग आहेत. जगातील खेळाडू स्वत:च्या देशापेक्षा अन्य देशांचे पदार्थ चाखण्यात सध्या मग्न आहेत.
लंडन ऑलिम्पिक एका आठवड्यानंतर व्यवस्थित पार पडल्यामुळे लंडन शहराचे महापौर बोरिस जॉन्सन यांची लोकमानसात प्रतिमा खूपच उंचावली आहे. स्थानिक लोकांनी तर बोरिस जॉन्सन यांना ब्रिटनचे भावी पंतप्रधान म्हणूनही पसंती दिली अहे. बोरिस जॉन्सन यांनी मात्र विनम्रपणे या शक्यतेचा इन्कार केला आहे. त्यांचे म्हणणे आहे, ऑलिम्पिकमुळे मिळालेली लोकप्रियता ऑलिम्पिक संपल्यानंतर तत्काळ खाली येणार आहे. लोकांची स्मरणशक्ती फार दुबळी असते.
अंधश्रध्दा आहे सर्वत्र
ब्रिटिश महिला हॉकी संघाची लॉस अनस्वर्थ सामन्यात उतरण्याआधी तीन वेळा प्रसाधनगृहात जाते. तिने आपली सहकारी अ‍ॅश्ली बॉल हिला सामन्यांआधी डोक्याचे केस सरळ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अ‍ॅश्लीचे केस कुरळे असून संघाच्या यशासाठी तिला केस सरळ करण्याचे दिव्यही पार पाडावे लागत आहे. अनस्वर्थच्या अंधश्रद्धेचा फायदा सध्या तरी ब्रिटनच्या हॉकी संघाला होत आहे. गटातील दोन्ही सामने जिंकून त्यांनी आघाडीचे स्थान पटकावले आहे. अनस्वर्थची सहकारी अ‍ॅलेक्स डॅनसन सामन्यात उतरण्याआधी आपली हॉकी स्टिक 15 वेळा गोल फिरवते.
सेंट्रल लंडन नव्हे, हे तर भुतांचे शहर!
PHOTOS: लंडन ऑलिम्पिकमधील काही हटके आणि आकर्षक नजारे...