आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनसारखी शिस्तच बनवू शकते सुपरपॉवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुभेदार विजयकुमारने नेमबाजीत रौप्य जिंकून ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या दोन केली आहे. बीजिंगच्या तुलनेत भारत लंडनला अधिक पदक जिंकेल, अशी आशा आहे. सुवर्ण जिंकणे तसे अजूनही कठीण वाटते. ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी आपण यंदा 8 ते 9 पदके जिंकू शकतो, असा दावा भारतीय अधिका-यांनी केला होता. खरे तर बीजिंगपेक्षा एक पदक अधिक जिंकणेसुद्धा पुढे गेल्यासारखेच आहे. मात्र, हे पुरेसे आहे काय ? तेसुद्धा केव्हा? बीजिंगमध्ये तीन पदके जिंकली असताना. आम्ही हेलसिंकी ऑलिम्पिक (1952) मध्ये दोन पदके जिंकली होती. तीन पदकांसाठी आम्हाला 2008 पर्यंत वाट बघावी लागली. दमदार प्रदर्शन न करण्यामागे सुविधेची उणीव हे गेल्या कित्येक वर्षांपासून एकच कारण सांगितले जाते. मात्र, गेल्या काही दशकांपासून असे राहिले नाही. आपल्याकडे महत्त्वाकांक्षेची कमी आहे. मात्र, आपणाला लक्ष्यापर्यंत पोहोचणे माहिती आहे, असे मला वाटते.
चीनच्या उदाहरणाला दुर्लक्षित करणे कठीण आहे. दोन्ही देश आर्थिक विकासाबाबत एकसारखे आहेत. खेळाबाबत आपण खूप मागे आहोत. बीजिंगमध्ये चीनने 100 पदके जिंकली होती. लंडनमध्ये त्यांनी 40 पदके मिळवली होती. भारताची स्थिती निराशाजनकच आहे. येथे दोन्ही देशांच्या पदकांची तुलना केली जाऊ शकत नाही. कित्येक वर्षांची तयारी, सरावामुळे चीन भारतापेक्षा शेकडो मैल पुढे आहे. चीनने आपली लोकसंख्या आणि सुविधेचा पूर्ण उपयोग केला. अव्वल क्रमांकावर पोहोचणे हे त्यांचे एकमेव लक्ष्य आहे. तेथे प्रतिभेला शोधण्याचे मार्ग अत्यंत परिणामकारक आहेत. शहरापासून ते दूर गावापर्यंत जो प्रतिभावंत मुलगा मिळतो त्याला स्पोर्ट्स अकादमीत दाखल केले जाते. यानंतर कठोर परिश्रमास सुरुवात होते. यामुळे तेथे एकाच खेळात अनेक दर्जेदार खेळाडू तयार होतात. लंडन ऑलिम्पिक याचे जिवंत उदाहरण आहे. लंडनला डायव्हिंग, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक आणि बॅडमिंटनमध्ये चीनने क्लीनस्वीप केले होते. खरे तर रणनीती आपण अनेक वेळा ठरवतो. प्रश्न याला कार्यान्वित करण्याचा आहे. चीनमध्ये फक्त खेळाडू समर्पण, शिस्त आणि महत्त्वाकांक्षेचे प्रदर्शन करीत नाहीत, तर संपूर्ण चीनमध्ये हे बघायला मिळते. भारताला खेळात सुपरपॉवर बनायचे असेल तर चीनसारखे समर्पण, शिस्त आणि महत्त्वाकांक्षा दाखवावी लागेल.
ज्युडो विजेत्याची पुतीननी घेतली गळाभेट