आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • London Olympics Indian Woman Players Ready To Fight

ऑलिम्पिक स्पेशल : भारताच्या ‘सुवर्णकन्या’ सज्ज; ज्वाला-अश्विनी जोडीचा दबदबा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - भारताने ऑलिम्पिकच्या महाकुंभामध्ये काही विशिष्ट खेळांच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली आहे. यामध्ये आता बॅडमिंटनचीही भर पडली आहे. गत वर्षभरापासून वाढत्या खेळाडूंच्या संख्येमुळे बॅडमिंटनला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. यामध्ये स्टार ठरली ती सायना नेहवाल. इंडोनेशिया, थायलंड ओपनची स्पर्धा गाजवणार्‍या सायनाने बॅडमिंटनमध्ये आपला दबदबा निर्माण केला. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून पदकाची आशा पूर्ण करण्याची क्षमता असल्याचे दिसून येते. जबरदस्त फॉर्मात असलेल्या सायनाकडे मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मोठा अनुभव आहे. तसेच कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणार्‍या चीनच्या सर्वच खेळाडूंना तिने गत महिन्यात चांगलीच धूळ चारली आहे. त्यामुळे तिचा पदकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग फारच सोपा असल्याचे मानले जाते.
एकेरीत सायना नेहवाल व पी. कश्यपकडून पदकाची आशा आहे. दोघेही सध्या चांगलाच फॉर्मात आहेत. गत महिन्यातील स्पर्धा त्यांनी गाजवून सोडली. दुसरीकडे महिला दुहेरीत आश्विनी पोनप्पा व ज्वाला गुट्टा ही जोडीदेखील काहीतरी कमाल करून दाखवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, सर्वात जास्त नजर असणार आहे ती सायना नेहवालवर. इतर स्पर्धांतील अनुभवाच्या बळावर ती पदकाचे शिखर गाठेल, असे चित्र आहे. पदकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे तिने सांगितले.
21 सुवर्णांची सम्राज्ञी! - 2003 मध्ये बॅडमिंटनच्या करिअरला सुरुवात करणारी सायना 21 सुवर्णपदकांची सम्राज्ञी आहे. गत नववर्षाच्या करिअरमध्ये तिने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांतून 21 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. एवढी पदके मिळवणारी ती एकमेव भारतीय खेळाडू आहे. सुपर सिरीज फायनलमध्ये धडक मारणारी ती पहिली भारतीय ठरली. कॉमनवेल्थमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले.
चीनची भिंत तोडली! - वयाच्या 18 व्या वर्षी बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन सायनाने यापूर्वी आपले नशीब आजमावले होते. उपांत्यपूर्व फेरीचा पल्ला तिने यशस्वीपणे गाठला होता. मात्र, चीनच्या खेळाडूंना या प्रतिभावंत खेळाडूला वेसण घातले अन् सायनाचे आव्हान संपुष्टात आले. याचाच वचपा तिने स्वीस ओपन, थायलंड व इंडोनेशिया ओपन सुपर सिरीजमध्ये काढला. चीनच्या सर्वच अव्वल बॅडमिंटनपटूंना तिने धूळ चारली. बॅडमिंटनमध्ये मजबूत मानल्या जाणार्‍या चीनच्या भिंतीलाच तिने धुळीस मिळवले. करिअरमध्ये तिने पाच वेळा मोठय़ा स्पर्धेत चीनच्या खेळाडूंना पराभूत केले.
ज्वाला गुट्टा - महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात जन्म झालेल्या ज्वाला गुट्टाने महिला व मिर्श दुहेरीत आपला दबदबा निर्माण केला. 2006 मध्ये तिने र्शीलंका आंतरराष्ट्रीय सॅटेलाइट बॅडमिंटन स्पर्धेचा किताब पटकावला.त्यापाठोपाठ सायप्रस बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपदही तिने मिळवले.
2008 मध्ये ज्वालाने नेपाळ इंटरनॅशनल ओपन सिरीज व योनेक्स डच ओपन ग्रँड प्रिक्सचे अजिंक्यपद आपल्या नावे केले. तसेच 2010 दिल्ली येथील कॉमनवेल्थ स्पर्धेत ज्वालाने महिला दुहेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले. मिर्शमध्ये तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
2011 लंडन येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने महिला दुहेरी गटात कांस्यपदक मिळवले.
रौप्य 2010 कॉमनवेल्थ (मिर्श दुहेरी), सुवर्ण 2010 कॉमनवेल्थ (महिला दुहेरी), कांस्य 2011 वर्ल्ड चॅम्पियनशिप (महिला दुहेरी).
अश्विनी पोनप्पा - कर्नाटकमधील अश्विनी पोनप्पाने पहिल्यांदा 2001 मध्ये भारतीय ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली. तसेच 2006 मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेतही तिने सुवर्णपदक पटकावले. ज्वाला गुट्टासोबत महिला दुहेरीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या अश्विनीने 2010 कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदकावर धडक मारली.
रौप्य 2010 कॉमनवेल्थ (मिर्श दुहेरी)
सुवर्ण 2010 कॉमनवेल्थ (महिला दुहेरी)
रौप्य 2011 वर्ल्ड चॅम्पियनशिप (महिला दुहेरी)