आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनंदनाच्या कला! तरण तलावात एकमेकींना ‘फ्रेंच किस’ देण्याची लागण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन ऑलिम्पिकच्या प्रेक्षकांना आकर्षित करताहेत विविध देशांच्या विजेत्या संघातील खेळाडूंच्या एकमेकांचे अभिनंदन करण्याच्या नाना कला. विशेषत: महिला खेळाडूंच्या विजय सेलिब्रेट करण्याच्या ‘स्टाइल’कडे प्रेक्षकांचे बारकाईने लक्ष आहे. भारताच्या सायना नेहवालने उपांत्य फेरीत धडक मारताना मिळवलेला विजय जमिनीवर दोन्ही हात थोपटून कोर्टला अभिवादन करून सेलिब्रेट केला. भारताच्या विजेंदरसिंग आणि अन्य सहका-यांनी आकाशात पंच मारून विजयाचा आनंद साजरा केला. भारताच्या गगन नारंगने कांस्यपदक मिळाल्याचा आनंद गन हातात उंचावून साजरा केला. मात्र, महिला स्पर्धकांच्या जोडीने किंवा संघाने ज्या पद्धतीने आनंद साजरा केला त्या त-हा पाहण्यासारख्या आहेत. महिला खेळाडूंनी एकमेकांप्रती व्यक्त केलेल्या भावना कोणत्या चौकटीत बसवायच्या, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. यजमान ब्रिटनच्या फुटबॉल संघाचा गोल केल्यानंतरचा ‘बूब शेक’ प्रेक्षकांना कोणता आनंद देतो? जमिनीवर लोळण घेणे किंवा खांद्याला खांदा घासण्याचे प्रकार वाढले आहेत. ब्रिटनच्याच पहिले सुवर्णपदक मिळवून देणा-या रोइंग जोडीचा हिएदर स्टनिंग आणि हेलेन ग्रोव्हर यांची रोइंगच्या गणवेशातच आनंद व्यक्त करण्याची त-हा आगळीच होती. एकमेकांना मिठ्या मारून त्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, त्यांची ती अदा प्रेक्षकांना भावली नाही.
फक्त स्वत:च्याच सहका-यांचे नाही, तर पराभूत प्रतिस्पर्ध्याचे अशा पद्धतीने अभिनंदन करण्याची प्रथा वाढत चालली आहे. 10 मीटर्स पिस्तूल प्रकारात गगन नारंग शांतपणे एका कोप-यात बसला असताना रुमानियाच्या विजेत्याने इटलीच्या रौप्यपदक विजेत्याचे खांदे आपल्या जवळच्या मित्राचे खांदे दाबावेत तेवढ्या सलगीने दाबले.
तरण तलावात एकमेकींना ‘फ्रेंच किस’ देण्याची लागण लागली होती.
बीच व्हॉलीबॉल स्पर्धेतील महिला स्पर्धकांच्या अभिवादन आणि अभिनंदन करण्याच्या विविध कलांबद्दल विचारू नका. पार्श्वभागावर वेगवेगळ्या पद्धतीने हाताने मारण्याचे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. एकमेकींच्या गालाला गाल घासणे किंवा गालाला हात लावणे नित्याचे झाले आहे. ‘बट्ट पॅट’ हा प्रकार तर सर्वांनीच आत्मसात केला आहे.
एकमेकींनी घट्ट मिठ्या मारून आनंद व्यक्त करणे बीच व्हॉलिबॉलमधलाचा अभिनंदनाचा प्रकार. अमेरिकन जिम्नॅस्टचीदेखील यंदाची अभिनंदनाची तीच शैली आहे. ब्राझील हँडबॉल संघ मात्र वेगळ्याच पद्धतीने अभिनंदन करतो. खेळाडू आपल्या सहका-याच्या बाहुपाशात स्वत:ला झोकून देतात. ऑस्ट्रेलियन जलतरणपटूंपैकी महिला रिले संघ गटागटाने एकमेकांना मिठ्या मारून अभिनंदन करताना दिसले. स्पॅनिश वॉटरपोलो संघाने तर पाण्यातच एकमेकांना मिठ्या मारून सामुदायिक अभिनंदन आणि अभिवादन केले.
ऑलिम्पिक : अश्रू....आनंदाचे अन् दुःखाचे...
PHOTOS : चला ऑलिम्पिक सफारीला...
PHOTOS: ऑलिम्पिक 2012 मधील आतापर्यंतचे गोल्‍ड मेडलिस्‍ट
ऑलिम्पिक डायरीः आयोजकांची गोची