आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेल्प्स पोहोचला ‘विशी’त : करिअरमधील 20 पदके पूर्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - सर्वाधिक पदकांचा किंग स्टार जलतरणपटू मायकल फेल्प्सने गुरुवारी मध्यरात्री ऑलिम्पिकमधील दुसरे सुवर्णपदक पटकावले. या पदकासह त्याने करिअरमधील 20 सुवर्णपदके पूर्ण केली. 200 मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात त्याने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने ही स्पर्धा 1 मि. 54.27 मिनिटांमध्ये जिंकली. त्याचे हे स्पर्धेतील चौथे पदक ठरले. यापूर्वी त्याने दोन रौप्य व एक सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिक इतिहासातील त्याचे हे 20 वे पदक आहे. कट्टर प्रतिस्पर्धी रेयान लोश्लेला पिछाडीवर टाकून त्याने ही चमकदार कामगिरी केली. यामुळे रेयानला रौप्य व हंगेरीच्या लैज्लो केसला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये अमेरिकेच्या टेलर क्लॅरीने ऑलिम्पिक विक्रम नोंदवला. त्याने एक मिनिट 53.21 सेकंदांमध्ये सुवर्णपदक जिंकले. जपानचा रियोसुके इरी (1.53.78) रौप्य व अमेरिकेचा रेयान लोश्ले (1.53.94) कांस्यपदकाचे मानकरी ठरले. महिलांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये अमेरिकेची रेबेका सोनीने विश्वविक्रमासह सुवर्णपदकावर नाव कोरले. तिने हे अंतर 2 मिनिटे 19.59 सेकंदांत पूर्ण केले. रेबेकाने बीजिंग ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक मिळवले होते. जपानच्या सुझुकी सातोमीला (2.20.72) रौप्य व लुलिया इफिमोवाला (2.20.92) कांस्यपदक मिळाले.
सुझुकीने आशियाई स्पर्धेतील विक्रमाची बरोबरी केली, तर इफिमोवाला युरोपियन विक्रम नोंदवता आला.