आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Olympic Village Like A Sex Drinking And Drug Bye The Secrets Olympian Books

ऑलिम्पिक व्हिलेज बनले सेक्सचा अड्डा; पाण्याच्या बाटल्यांमधून मिळते दारू!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन: क्रीडा स्पर्धेचे महाकुंभ मानल्या जाणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेच्या प्रारंभाला बोटावर मोजण्या इतकेच दिवस शिल्लक राहीले आहे. परंतु ऑलिम्पिक व्हिलेजला 'पार्टी झोन'चे रुप आले आहे. येथे खेळाडू सेक्स, ड्रग्ज आणि दारूच्या नशेत तर्रर्र होत असल्याचे वृत्त आहे. ब्रिटन येथील एका माजी अ‍ॅथलीट्‍सने याचा खुलासा त्याचा पुस्तकात केला आहे.
ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये दारू आणि कंडोमचा पुरवठा करणे एक आव्हानच असते, असा दावा 'दी सिक्रेट ऑलिम्पियन' या पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकात असेही सांगण्यात आले आहे की, 2000 मध्ये सिडने ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलीट्‍ससाठी सुमारे 70 हजार कंडोमचा पुरवठा करण्यात आला होता. आश्चर्यकारक गोष्‍ट म्हणजे हा स्टॉक अवघ्या एका आठवड्यात संपला होता.
ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये अल्कोहल आणि ड्रग्जवर प्रतिबंध असतानाही पाण्याच्या बाटलीत दारू भरून नेली जाते, असाही खुलासा या पुस्तकात करण्यात आला आहे. लेखकाने आपले नाव जाहीर केले नसून 'ऑलिंम्पिक व्हिलेज'मध्ये जे प्रकार घडतात ते तेथपर्यंतच सीमीत असतात, असेही सां‍गितले आहे.
कथा ऑलिम्पिकची : ऑलिम्पिक विश्वबंधुत्त्वाचा मनोहारी आविष्कार
ऑलिम्पिक स्पेशल : लहान मुलांना आवडत नाही एका डोळ्याचा शुभंकर!
लंडन ऑलिम्पिक: दहशतवादी कटाचा पर्दाफाश !