आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ खेळांनी सुरू झाला ऑलिम्पिकचा महाकुंभ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- क्रीडा स्पर्धेचे महाकुंभ मानल्या जाणा-या ऑलिम्पिक स्पर्धेच्या प्रारंभाला मोठा ऐतिहासिक असा वारसा लाभला आहे. 116 वर्षे जुन्या असलेल्या या स्पर्धेचा इतिहासदेखील अधिकच रोमांचक आहे. शतकापासून सुरू झालेल्या या स्पर्धेची 30 वी ऑलिम्पिक ही लंडनमध्ये खेळवली जाणार आहे. 1896 मध्ये सर्वप्रथम अथेन्स येथे ऑलिम्पिक स्पर्धेचा श्रीगणेशा करण्यात आला.
या वेळी या स्पर्धेत केवळ 9 खेळांचा समावेश होता. पहिल्यांदा अथेन्समध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये 9 खेळांमध्ये एकूण 241 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. एकूण 43 पदकांसाठी त्यांच्यामध्ये शर्थीची झुंज पाहायला मिळाली होती. मात्र, जसजशी या स्पर्धेविषयीची लोकप्रियता वाढत केली. त्यापद्धतीने स्पर्धेतील खेळांच्या संख्येत वाढ होत गेली आहे. आजच्या घडीला लंडन ऑलिम्पिकमध्ये 26 खेळांचा समावेश आहे.
हे सर्व खेळ एकूण 302 प्रकारामध्ये खेळवले जाणार आहेत. त्यापूर्वी 1992 मध्ये बार्सिलोना येथील स्पर्धेत 32 खेळ खेळवले गेले होते.
या वर्षी यामधील सहा खेळांमध्ये कपात करण्यात आली आहे. लंडनमधील ऑलिम्पिक स्पर्धेत 26 खेळामध्ये एकूण 10,500 खेळाडू आपले नशीब आजमावणार आहेत.
आगामी ऑलिम्पिकमध्ये 28 खेळ- आगामी 31 व्या ऑलिम्पिक स्पर्धेत दोन नव्या खेळांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे ही स्पर्धात 28 खेळांमध्ये खेळवली जाईल. यामध्ये गोल्फ व रग्बीच्या नावांचा उल्लेख आहे. 31 वी स्पर्धा ही 2016 मध्ये खेळवली जाईल. यापूर्वी 2008 मध्ये बींजिंग येथील ऑलिम्पिक स्पर्धेत 28 खेळ सहभागी होते.
आयओसीला अधिकार - ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या खेळाला सहभागी करायचे आणि कोणते कमी करायचे, याबाबतचे सर्वस्वी अधिकार हे आंतरराष्ठीय ऑलिम्पिक महासंघाला असतात. या महासंघाच्या निर्णयानुसार ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांची संख्या निश्चित केली जाते. या कमिटीने 1992 मध्ये बार्सिलोना येथील ऑलिम्पिक स्पर्धेत 32 खेळांचा समावेश केला होता. या वेळी बेसबॉल या नव्या खेळाचा समावेश करण्यात आला होता. मात्र, 2008 बीजिंग ऑलिम्पिकमधून बेसबॉलला वगळण्यात आले.