आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...पेसला अश्रू अनावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - लिएंडर पेस टेनिसमधील वाद वाढलेला असताना त्याने शांत राहणे पसंत केले. पुरुष दुहेरीचा सामना हरल्यानंतर त्याला आपले अश्रू रोखता आले नाही. पेस-विष्णुवर्धनला बुधवारी फ्रान्सच्या विल्फ्रेड सोंगा- माइकल लोड्राने पराभूत केले. लढत झाल्यानंतर पेसने सांगितले की, आम्ही पहिल्यांदा सोबत खेळतो आणि चांगले खेळलो. त्यानंतर त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. ‘माझा डोळ्यात पाणी आले कारण या स्पर्धेसाठी मी खूप भावुक झालो होतो. मागील महिन्यात जो वाद झाला तो दिसून येणे स्वाभाविक आहे. मी आपल्या देश, आपले लोक आणि नवोदित विष्णुसाठी भावुक झालो. आम्ही मनाने खेळलो आणि चांगले प्रदर्शन केले. दु:ख आहे की, ते पुरेसे ठरले नाही,’ असे पेस म्हणाला.
नवीन जोडीला संधी द्यावी : पुरुष दुहेरीत आम्ही पराभूत झालो असलो, तरी एक नवीन जोडी उदयास आली आहे. मी यासाठी ब-याच दिवसांपासून प्रतीक्षेत होतो. भारतीय महासंघाने सोमदेव, युकी भांबरी, सनम सिंह आणि विष्णूला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे पेस म्हणाला.