आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानियाच्या मनधरणीसाठी एआयटीएची नवी खेळी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ऑलिम्पिक स्पर्धेच्या तोंडावर निर्माण झालेल्या दुफळीला दूर करण्यासाठी अखिल भारतीय टेनिस महासंघाच्या नाकीनऊ आले आहे. निर्माण झालेल्या वादामुळे नाराजीचा सूर आळवणाºया सानिया मिर्झाच्या मनधरणीसाठी एआयटीएने नवी खेळी खेळली आहे. यासाठी चक्क नसीमा मिर्झाला भारतीय टेनिस संघाच्या व्यवस्थापकपदी निवड केली आहे. नसीमा यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस संघ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. व्यवस्थापकासह प्रशिक्षकाचा कुठलाही अनुभव नसताना केलेल्या निवडीबाबत जोरदार चर्चा केली जात आहे. सानियाची नाराजी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप एआयटीएवर लावला जात आहे. पाच सदस्यीय टेनिस संघाच्या व्यवस्थापन पथकामध्ये नसीमाची निवड करण्यात आली आहे. खेळाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना निवड करण्यात आलेल्या नसीमा एकमेव आहेत.
उशिरा नाव केले जाहीर - गेल्या दोन दिवसांपूर्वीच अखिल भारतीय टेनिस महासंघाने ऑलिम्पिकसाठी रवाना होणाºया टेनिस संघाच्या व्यवस्थापन पथकाची नावे तयार केली होती. मात्र, नसीमा यांच्या नावावरून वादंग निर्माण होण्याच्या भीतीमुळे उशिरा संघाची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आल्याचे वृत्त आहे.
अधिकारी म्हणून नावाचा उल्लेख!- भारतीय ऑलिम्पिक संघाकडे पाठवण्यात आलेल्या यादीमध्ये नसीमा मिर्झांचा उल्लेख अधिकारी म्हणून करण्यात आला आहे. या वेळी त्याच्यासोबत मिश्राच्या नावाचाही समावेश आहे. हे दोघेही सोमदेव देववर्मन याच्या ट्रेनरसोबत लंडनमध्ये ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहतील.
अनुभवाचा फायदा- सानियाच्या आईकडे अनुभव चांगला आहे.त्यामुळे त्यांची व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली आहे. महिला टेनिसपटूंच्या देखभालीसाठी त्यांचे मोलाचे सहकार्य मिळेल. यापूर्वी अनेक वेळा त्यांना संघासोबत पाठवण्यात आले होते. - कर्नल रणबीर चौहान, एआयटीए, कार्यकारी समिती सदस्य.
नवा वाद : सानियाच्या आईची संघ व्यवस्थापक म्हणून निवड
प्रशिक्षणाचा कुठलाही अनुभव नसताना केली निवड, चर्चेला उधाण
अखिल भारतीय टेनिस महासंघाची सारवासारव; महिला टेनिसपटूंच्या काळजीसाठी निवडल्याची कबुली!