आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘किंग खान’ उतरणार फुटबॉलच्या मैदानावर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - क्रिकेटमध्ये यशस्वी ठरलेला सिनअभिनेता शाहरुख खानने आता फुटबॉलच्या मैदानावरही उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील सर्वात जुन्या फुटबॉलच्या डेम्पो स्पोर्टिंग क्लबचे 50 टक्के भाग (शेअर्स) विकत घेण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे.याबाबत चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला क्लबच्या पदाधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. अद्याप यावर कोणत्याही प्रकारचे एकमत झाले नाही.

‘भारतामध्ये फुटबॉलसाठी चांगले वातावरण आहे. यातून फुटबॉलचा विकास गतीने होण्यासाठी मी सहभागी होण्याचा विचार करत आहे. डेम्पो क्लबच्या माध्यमातून हे सर्व काही शक्य होईल. या क्लबची मोठी ख्याती आहे. 50 टक्के सहभाग खरेदी करून क्लबशी जोडले जाण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. यामध्ये यश मिळेल असा विश्वास आहे,’ असे शाहरुख म्हणाला.

या क्लबशी जोडला गेल्यास शाहरुखचे यामध्ये 30 कोटींचे शेअर असणार आहेत. देशातील सर्वात मोठा व जुना म्हणून हा क्लब ओळखला जातो. डेम्पो स्पोर्टिंग क्लबचे मालक र्शीनिवास म्हणाले की, सहभाग खरेदी करण्यावर अद्याप केवळ चर्चा सुरू आहे. यावर अंतिम मत तयार झालेले नाही. सिनेअभिनेत्याकडून वेळा ऑफर येत असतात. मात्र सखोल चर्चेनंतर त्या फिसकटतात हेदेखील खरे आहे.