आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदक देशाला, वडिलांना अर्पण: विजयकुमार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारताला शूटिंग या खेळानेच लंडन ऑलिम्पिकमधील दुसरे पदक मिळवून दिले. हे पदक मिळवून देणारा भारतीय आर्मीतला नायब सुभेदार विजयकुमार याने तमाम भारतीयांच्या चेह-यावर हास्य फुलवले. गगन नारंगने शूटिंग रेंजवर मिळवलेल्या कांस्यपदकानंतर शूटिंग या खेळानेच भारताला रौप्यपदक मिळवून दिले आहे. गेल्या तीन ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेल्या एकूण 6 पदकांपैकी 4 पदके शूटिंग या खेळाची आहेत.
डोपिंग चाचणीहून परतलेला हसतमुख विजयकुमार आज भारतीय प्रसिद्धिमाध्यमांना दिलखुलासपणे मुलाखत देत होता. सर्वप्रथम तो म्हणाला, ‘हे पदक माझे वडील जे एक्स-आर्मीमॅन आहेत - त्यांना आणि तमाम भारतवासीयांना मी अर्पण करतो. माझ्या पदकांच्या पंक्तीत फक्त ऑलिम्पिक पदकच नव्हते. मी एशियन चॅम्पियन आहे. गतवर्षीच अमेरिकेत विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकून रौप्यपदक पटकावले होते आणि ऑलिम्पिकसाठी पात्रही ठरलो होतो. ऑलिम्पिक पदक जिंकणे हे माझे स्वप्न होते. माझ्या घराच्या भिंतीवर लटकणा-या पदकांमध्ये सर्व पदके आहेत. फक्त एकच पदक नव्हते ते आज मिळाले.’
हे माझे पहिलेच ऑलिम्पिक आहे. परंतु दडपण वगैरे काही नव्हते. कारण आम्हा आर्मीवाल्यांच्या रक्तातच दडपण येऊ न देण्याची कला असते. आर्मीवाले जिद्दी असतात. त्याच जिद्दीमुळे आणि संयमामुळे आज रौप्यपदक पटकावू शकलो.
मी वर्ल्ड चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ, एशियन गेम्स आदी स्पर्धांमध्ये दडपणाशिवाय शूटिंग करतो. पण ही ऑलिम्पिक स्पर्धा आहे याची जाणीव मला होती. काल रात्री व्यवस्थित झोपही लागली होती. 11 वाजताच झोपलो. स्पर्धेचे दडपण नव्हते. जे काही करीन ते चांगलेच करीन, असा आत्मविश्वास होता. त्यामुळे पदक मिळवू शकलो. शूटिंग या खेळात तुम्हाला शांत, संयमी राहावे लागते. तुमच्यावर नियंत्रण मिळवावे लागते. गन्स आणि शूटिंग अचूक करणे या गोष्टींइतकाच हा खेळ डोक्यातही असतो. तेथे गडबड होता कामा नये.
शूटिंग या खेळाचा मानसिकतेशीही मोठा संबंध आहे. मी गेली 6-7 वर्षे त्यासाठी खडतर मेहनत घेत आहे. भारतात शूटिंग हा खेळ झपाट्याने वाढत आहे. गेल्या 3 ऑलिम्पिकमध्ये शूटर्सनी भारताला हमखास पदक मिळवून दिले आहे. भारतीय नेमबाजांनाही त्याचे श्रेय द्यायला हवे. भारतीयांनी शूटिंग या खेळात दबदबा निर्माण करायला सुरुवात केली आहे. पदके मिळाली नाहीत म्हणून निराश होऊ नका, प्रत्येकाची कामगिरी जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या तोडीची आहे. विश्वक्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेले कितीतरी शूटर्स या वेळी अंतिम फेरीसाठीदेखील पात्र ठरले नाहीत, याकडे विजयकुमारने लक्ष वेधले.
सुवर्णपदक विजेता क्युबन लॉरिस पुपो : 2000 पासून मी संघात आहे. बीजिंग ऑलिम्पिकपासून मला अधिक स्फूर्ती मिळाली. हे माझे चौथे ऑलिम्पिक. मी विवाहित आहे. परंतु मला मूल झाले नाही.
माझ्या पत्नीला मला सांगावेसे वाटते हे सुवर्णपदकदेखील या जगातील एक सुंदर गोष्ट आहे. देशाकडून काय बक्षीस मिळणार ठाऊक नाही असे पुपो म्हणाला.
OLYMPIC: विजेंद्र सिंगचा विजय, सुपर सायना उपांत्‍यफेरीत धडक
OLYMPIC: सुपर सायना उप-उपांत्‍यपूर्व फेरीत, ज्‍वाला-अश्विनी जोडीचाही विजय
OLYMPIC तिसरा दिवस: ज्‍वालाचा राग आणि सायनाचा विजय