Home »Sports »Other Sports» 10 Amazing Cricket Facts About The Pakistani Superstar Shahid Afridi

जाणून घ्‍या, पाकिस्‍तानचा स्टार क्रिकेटर शाहीद आफ्रिदीबाबत 10 रंजक बाबी

दिव्यमराठी वेब टीम | Apr 21, 2017, 11:46 AM IST

इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्तानचा आघाडीचा स्टार व माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याला एक खास गिफ्ट दिले आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडूंच्या सह्या असलेली विराट कोहलीच्या 18 नंबरची जर्सी त्याला भेट दिली आहे. तसेच आफ्रिदीला पुढील कारकिर्दीला शुभेच्छा देताना, तुझ्यासमवेत खेळताना खूप मजा आली असे सांगत विराटने आफ्रिदीच्या 20 वर्षाच्या इंटरनॅशनल क्रिकेटमधील कारकिर्दीचा गौरव केला. पाकिस्तानामधील एका पत्रकाराने सोशल मिडियात त्या जर्सीचा फोटो अपलोड केल्याने ही माहिती आपल्यासमोर आली. या अनुषंगाने आज आम्ही सांगणार आहोत आफ्रिदीबाबत रंजक माहिती....
करिअरच्‍या पहिल्‍या मॅचमध्‍ये फ्लॉप-
- गोलंदाज मुश्ताक अहमद याला दुखापत झाल्‍यामुळे 16 वर्षीय शाहीद आफ्रि‍दीला पाकिस्तानने 2 ऑक्‍टोबर 1996 रोजी केनियाविरुद्ध 11 खेळाडूंमध्‍ये स्‍थान दिले होते.
- तो 11 मध्‍ये खेळला; परंतु त्‍याला बॅटिंगची संधी मिळाली नाही.
- पण, गोलंदाजीची संधी मिळाली होती. त्‍याने 10 षटकांत 32 धावा दिल्‍या होत्‍या. परंतु, एकही विकेट त्‍याला काढता आली नव्‍हती.
- पहिल्‍या मॅचमध्‍ये फारशी चमक दाखवू न शकलेला आफ्र‍िदी दुस-या मॅचमध्‍येच स्‍टार झाला.
बनवला विश्‍वविक्रम-
- 4 ऑक्‍टोबर 1996 रोजी आफ्रिदीला श्रीलंकेविरुद्ध दुसरी मॅच खेळायची संधी मिळाली. त्‍यावेळी सईद अन्वर कर्णधार होता. त्‍याने आफ्रि‍दीला वन डाऊनला पाठवले.
- 16 वर्षीय आफ्रिदी श्रीलंकेच्‍या गोलंदाजावर अक्षरश: तुटून पडला.
- त्‍याने अवघ्‍या 37 चेंडूत 11 षटकार आणि 4 चौकाराच्‍या मदतीने शतक पूर्ण केले.
- विशेष म्‍हणजे तो पहिल्‍यांदाच आंतरराष्‍ट्रीय सामन्‍यात फलंदाजी करत होता.
- नंतर न्यूझीलंडचा कोरी अँडरसन (36 बॉल) आणि आता ए. बी. डिव्‍ह‍िलियर्स (31 बॉल) यांच्‍या नावावर हा विक्रम आहे.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्‍या, आफ्रिदीबाबत रंजक माहिती...

Next Article

Recommended